मुंबई : मुंबईतुन एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईतील अतिशय गजबजलेला परिसर असलेल्या धारवी झोपडपट्टीजवळील शाहूनगरच्या कमलानगर ( Kamla Nagar Fire ) आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे. या आगीच तब्बल 25 हून अधिक घरांना झळ बसली आहे. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले असुन आग विझवण्याच काम सुरू आहे.
[read_also content=”परवानगी शिवाय फोटो काढल्यानं भडकली आलिया! सोशल मीडियावर व्यक्त केला संताप, पोलिसांना मागितली मदत https://www.navarashtra.com/movies/alia-bhatt-got-angry-for-taking-pictures-without-permission-nrps-371414.html”]
मुंबईतील धारवी झोपडपट्टीला शेजारी असलेल्या शाहूनगरच्या कमलानगर झोपडपट्टीमध्येपहाटे चार वाजेच्या सुमारास ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेत कुठलीही जीवित हानी झालेली नाही अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र परिसरात सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.