Megablock
मुंबई : देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी लोकलच्या सेंट्रल आणि हार्बल मार्गांवर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. दिवा – कल्याण अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत, सकाळी ८.३७ ते दुपारी ४.३६ या वेळेत ठाण्याहून सुटणाऱ्या धीम्या व अर्ध जलद सेवा दिवा आणि कल्याण स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या डोंबिवली स्थानकात थांबतील आणि निर्धारित वेळेच्या १० मिनिटे उशिरा पोहोचतील. तर हाबर मार्गावरही मेगा ब्लॉक असणार आहे(Railway Mega Block ).
सकाळी ८.५१ ते दुपारी ३.५१ पर्यंत कल्याणहून सुटणाऱ्या अप धीम्या, सेमी जलद सेवा कल्याण आणि दिवा स्थानकांदरम्यान डोंबिवली स्थानकात थांबलेल्या अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि दिवा स्थानकात अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि १० मिनिटे उशिराने पोहोचतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी, वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० आणि चुनाभट्टी, वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक असेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोडवरून वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत आणि वांद्रे/गोरेगाव येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ पर्यंत सुटणारी हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीहून सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला प्लॅटफॉर्म क्रमांक ८ दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते संध्याकाळी ६ या ब्लॉक कालावधीत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वेवर प्रवास करण्याची परवानगी आहे.
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]