Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उदयनराजेंनी घेतली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या (Satara District Bank Election) रणधुमाळीला गती आली आहे. उदयनराजे भोसले यांनी कराडला भेट देत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Udayanraje meets Prithviraj Chavan), काँग्रेसचे ऍड उदयसिंह पाटील-उंडाळकर तसेच भाजपचे प्रदेश सदस्य डॉ. अतुल भोसले यांची भेट घेतली.

  • By Navarashtra News Network
Updated On: Nov 10, 2021 | 01:21 PM
उदयनराजेंनी घेतली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट; राजकीय चर्चांना उधाण
Follow Us
Close
Follow Us:

कराड : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या (Satara District Bank Election) रणधुमाळीला गती आली आहे. उदयनराजे भोसले यांनी कराडला भेट देत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Udayanraje meets Prithviraj Chavan), काँग्रेसचे ऍड उदयसिंह पाटील-उंडाळकर तसेच भाजपचे प्रदेश सदस्य डॉ. अतुल भोसले यांची भेट घेतली. त्यांनी जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवाद साधल्याने जिल्हा बँक निवडणुकीची भलतीच चर्चा कराड तालुक्यात रंगली आहे.

उदयनराजे भोसले यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची फलटण येथे सोमवारी भेट घेऊन सुमारे दीड तास बंद दाराआड चर्चा केली. या भेटीने जिल्हा बँकेच्या राजकारणात उलट सुलट चर्चा सुरू झाली. त्यानंतर उदयनराजेंनी आपला मोर्चा थेट कराडकडे वळवला. त्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. त्यांना दीपावालीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अनुषंगाने उदयनराजे यांनी आपली भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर मांडली असल्याचे समजते. यावेळी मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजित चव्हाण, सुनील काटकर उपस्थित होते.

त्यानंतर येथील खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात जाऊन कराड सोसायटी गटातील उमेदवार ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची भेट घेतली. या भेटीमध्ये स्वर्गीय लोकनेते विलासराव पाटील-उंडाळकर (काका) हे आपले राजकीय गुरु असल्याचे सांगत त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेसह विविध निवडणुका लढवण्याचे उदयनराजे यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगाने आपली भूमिका ऍड. पाटील यांच्या समोर मांडत कराड सोसायटी मतदार संघातील त्यांची भूमिकाही समजून घेतली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष व जनशक्तीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव, नगरसेवक हनमंत पवार उपस्थित होते.

दरम्यान, कृष्णा साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व भाजपाचे कार्यकारणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांची कृष्णा हॉस्पिटलवर जाऊन खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट घेतली. भोसले कुटुंबियातील कोणीही जिल्हा बँकेत उमेदवारी दाखल केलेली नाही. परंतु भोसले गटाचे जिल्हा बँकेतील महत्वपूर्ण आहे. उदयनराजे भोसले निवडणूक लढवत असलेल्या गृहनिर्माण गटातून तसेच कराड सोसायटी मतदार संघात त्यांची भूमिका निर्णायक आहे. या भेटीमध्ये दोन्ही गटातील उमेदवार आणि भविष्यातील जिल्हा बँकेचे राजकारण यावर सविस्तर चर्चा झाल्याचे समजते.

खासदार उदयनराजे भोसले यांनी कराडमध्ये येऊन जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या घटकांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. एकूणच या धावत्या दौऱ्यामुळे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रणधुमाळीला गती आल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Mp udayanraje bhosale meets former chief minister prithviraj chavan in karad nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2021 | 01:21 PM

Topics:  

  • Satara District Bank Election

संबंधित बातम्या

गुरुजींनो तुम्ही तरी लोकशाही टिकवा हो …! शिक्षक बँकेत चेअरमन खुर्चीसाठी संचालक-नेत्यांमध्ये मोठे लॉबिग सुरू
1

गुरुजींनो तुम्ही तरी लोकशाही टिकवा हो …! शिक्षक बँकेत चेअरमन खुर्चीसाठी संचालक-नेत्यांमध्ये मोठे लॉबिग सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.