
मुंबई : आयपीएल 2022 पूर्वी, बीसीसीआयने बायो-बबल नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी सर्व फ्रँचायझींना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आता मुंबई इंडियन्सने प्रोटोकॉल राखण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. फ्रँचायझीने मुंबईच्या जिओ वर्ल्ड गार्डनमध्ये 13,000 स्क्वेअर मीटर परिसरात एमआय अरेनाची स्थापना केली आहे. त्यात सर्व सोयी-सुविधा आहेत. इतकंच नाही तर टीम मेंबर्स आणि त्यांच्या कुटुंबियांशिवाय कोणालाही एंट्री मिळणार नाही.
The opening of MI Arena was a total धमाल event! ? P.S. You will just love Ro in this video. He was truly in his element. ??#OneFamily #MumbaiIndians MI TV pic.twitter.com/OB1MSXZpkU — Mumbai Indians (@mipaltan) March 21, 2022
रोहितची पुष्पा स्टाईल
मुंबई इंडियन्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘MI Arena’ चा व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये टीमचा कर्णधार रोहित शर्मा ‘पुष्पा स्टाईस’मध्ये फिरताना दिसत आहे. यासोबतच तो इतर खेळाडूंसोबत मुलांच्या विभागातही गोळीबार करताना दिसला. जसप्रीत बुमराहही हातात बंदूक घेऊन दिसला. संघातील बाकीचे खेळाडूही एमआय एरिनामध्ये गोळीबार करताना आणि पोलो खेळताना दिसतात.
फुटबॉल मैदानापासून कॅफेपर्यंत सुविधा
एमआय अरेनामध्ये फुटबॉल ग्राउंड, बॉक्स क्रिकेट, पिकल बॉल कोर्ट, फूट व्हॉलीबॉल, एमआय बॅटल ग्राउंड, किड्स झोन आणि एमआय कॅफे आहे. याशिवाय, टीम हॉटेलमध्ये राहणार आहे, ज्यामध्ये अत्याधुनिक जिम, मसाज खुर्च्यासह लाउंज रूम, गेमिंग कन्सोल, आर्केड गेम, इनडोअर बास्केटबॉल शूटर, म्युझिक बँडसाठी स्वतंत्र स्टेज, टेबल टेनिस, कॅफे, पूल टेबल, खेळाचे क्षेत्र आहे.
पहिला सामना 27 ला दिल्ली विरुद्ध
विक्रमी 5 वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा पहिला सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. रोहित शर्माशिवाय जसप्रीत बुमराह, किरॉन पोलार्ड, इशान किशन आणि सूर्यकुमार यादवसारखे स्टार खेळाडू संघात आहेत.