Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ओमायक्रॉन’वर मात करण्यासाठी लसीकरण करणे गरजेचे : हसन मुश्रीफ

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी असली तरी अजून कोरोना धोका कमी झालेला नाही. पुढील काळात तिसऱ्या लाटेचा, ओमायक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेता जिल्ह्यातील नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

  • By Navarashtra News Network
Updated On: Dec 18, 2021 | 04:28 PM
‘ओमायक्रॉन’वर मात करण्यासाठी लसीकरण करणे गरजेचे : हसन मुश्रीफ
Follow Us
Follow Us:

अहमदनगर / नवराष्ट्र नेटवर्क न्यूज : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी असली तरी अजून कोरोना धोका कमी झालेला नाही. पुढील काळात तिसऱ्या लाटेचा, ओमायक्रॉनचा (Omicron) संभाव्य धोका लक्षात घेता जिल्ह्यातील नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ओमायक्रॉनबाबत उपाययोजना व लसीकरण आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मनपा आयुक्त शंकर गोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित उपस्थित होते.

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला अधिक गती देण्याची गरज असून, त्यासाठी प्रशासनाने  नागरिकांच्या घरोघरी जाऊन लसीकरण मोहिम पूर्ण करावी. कोरोनाच्या तपासणीमध्ये जिल्हा राज्यात सर्वात पुढे असून, रोज पाच हजारपेक्षा चाचण्या जिल्ह्यात होत आहे. नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्ह्यात औषधसाठा, बेडची संख्या, ऑक्सिजनची उपलब्धता याबाबतचे नियोजन प्रशासनाने करावे अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. जिल्ह्यात आजपर्यंत ओमायक्रॉन व्हेरियंटचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. जिल्ह्यात आत्तापर्यंत 308 नागरिक हे परदेशातून आले असून, सर्वांची तपासणी करण्यात आली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात 97.90 टक्के एवढे असून, मृत्यूदर 1.99 टक्के इतका आहे. सध्या जिल्हयात 384 सक्रिय रुग्ण आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 9 लाख नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, त्यापैकी 5 लाख नागरिकांचा दुसरा डोस घेणे बाकी आहे. ज्यांचा दुसरा डोस बाकी आहे, अशा लोकांचा प्रशासनाने शोध घेऊन त्यांचे लसीकरण पूर्ण करुन घ्यावे. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत ज्यांचे लसीकरण बाकी आहे, त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेऊन प्रशासनास सहकार्य करावे. यासाठी आरोग्य विभागाने लसीकरणाची विशेष मोहिम राबवून नागरिकांचे लसीकरण पूर्ण करुन घ्यावे, अशा सूचना त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या वारसांना आर्थिक मदत म्हणून 50 हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत जिल्ह्यात 162 कोरोना मृतांच्या वारसांना मदत दिली गेली आहे. उर्वरित मृतांच्या वारसांना मदत लवकर कशी मिळेल, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

Web Title: Need to be vaccinated to overcome omicron virus infection says hasan mushrif nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2021 | 04:28 PM

Topics:  

  • Hasan Mushrif
  • Omicron Virus

संबंधित बातम्या

बोगस डॉक्टरांचा होणार गेम! क्युआर कोड स्कॅन करताच समोर येणार कुंडली; मंत्री Hasan Mushrif यांची विधानसभेत मोठी घोषणा
1

बोगस डॉक्टरांचा होणार गेम! क्युआर कोड स्कॅन करताच समोर येणार कुंडली; मंत्री Hasan Mushrif यांची विधानसभेत मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.