Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gokul Election : गोकुळचं राजकारण संपलं! आता मुंबई-पुण्यात दुधाला मिळणार सोन्याचा भाव? हसन मुश्रीफांनी सांगितला पुढचा प्लॅन!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनंतर आता राजकारणाला पूर्णविराम देत दूध उत्पादन आणि संकलन वाढवण्यावर भर देणार असल्याचं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवरही भाष्य केलं.

  • By विवेक
Updated On: Nov 15, 2026 | 05:12 PM
hasan mushrif

hasan mushrif

Follow Us
Follow Us:
  • दूध उत्पादन वाढवण्यावर भर
  • अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर मुश्रीफ यांची भूमिका स्पष्ट
  • संजय राऊत यांच्यावर मुश्रिफांचा जोरदार निशाणा
 

Gokul Election : कोल्हापूरच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक अखेर पार पडली आहे. अनेक वादविवाद, आरोप – प्रत्यारोप तसेच राज्य सरकारने नेमलेल्या शासननियुक्त संचालकांवरून झालेल्या गदारोळानंतर हि निवडणूक पार पडली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीला यश मिळालं तर सतेज पाटील यांच्या आघाडीचा पराभव झाला. यावरून राज्यभरात मोठा वाद निर्माण झाला. अश्यातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठं विधान केलं आहे. (Gokul Election)

अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर आता निवडणुकीतील कुरघोड्या आणि राजकीय गणितांना बाजूला ठेवून दूध संघाच्या कामकाजावर लक्ष केंद्रित करणार असल्याचं मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेसह संजय राऊत आणि रोहित पवार यांच्याबाबतही भाष्य केलं.

गोकुळमधील राजकारण संपलं, आता दूध उत्पादन वाढवणार!

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनंतर आता राजकारण करण्यापेक्षा दूध उत्पादकांच्या हिताला प्राधान्य देण्याची गरज असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं. कोल्हापूर वगळता राज्यातील इतर भागांमध्ये मोठ्या प्रमाणात दूध उपलब्ध होत नाही. त्यामुळे मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये गोकुळच्या दुधाला चांगला भाव मिळण्याची संधी आहे, असं त्यांनी नमूद केलं.

Aaditya Thackeray : एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना पुन्हा धक्का? ऑपरेशन टायगर 3 ची चर्चा सुरू होताच आदित्य ठाकरे संतापले

निवडणुकीच्या निकालाचा उल्लेख करताना मुश्रीफ म्हणाले की, समोरच्या गटाचे 13 आणि आमचे 12 संचालक निवडून आले होते. त्यामुळे कोणत्याही एका गटाला स्वतंत्रपणे कोरम पूर्ण करणं शक्य नव्हतं. ही वैधानिक अडचण राज्य सरकारने दूर केली. आता नवनिर्वाचित अध्यक्षांनी पुढाकार घेत कामाला सुरुवात केली आहे.

संजय राऊत यांच्यावर मुश्रीफांचा निशाणा

यावेळी संजय राऊत यांच्यावरही मुश्रीफांनी जोरदार टीका केली. महाराष्ट्रात प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. मात्र, इतर पक्षांवर बोलण्याआधी राऊत यांनी स्वतःच्या पक्षाची परिस्थिती पाहावी, असा टोला त्यांनी लगावला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कोण चालवत आहे, हे सर्वांना माहीत असल्याचं सांगत त्यांनी राऊत यांच्या वक्तव्यांवर नाराजी व्यक्त केली.

रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष

दरम्यान, रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेवरही मुश्रीफ यांनी मिश्किल टिप्पणी केली. रोहित पवार यांनी यापूर्वीच काही गोष्टी स्पष्ट करण्याचं सांगितलं होतं. आता त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानसमोर मफलर लटकवला आहे. 16 तारखेनंतर ते नेमकं काय बोलतात, हे पाहू आणि त्यानंतर प्रतिक्रिया देऊ, असं मुश्रीफ म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात महत्त्व आलं असताना मुश्रीफांच्या या विधानामुळे या विषयावरील उत्सुकता आणखी वाढली आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीच्या राजकारणात नेमक्या काय घडामोडी होतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Gokul Election : गोकुळच्या मतमोजणीवेळी शरद पवारांचा सतेज पाटलांना फोन! नेमकं काय म्हणाले होते पवार?

💡

Frequently Asked Questions

  • Que: हसन मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघाबाबत काय विधान केलं?

    Ans: गोकुळ दूध संघातील निवडणुकीचं राजकारण संपलं असून आता दूध उत्पादन आणि संकलन वाढवण्यावर भर देणार असल्याचं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

  • Que: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत किती संचालक निवडून आले होते?

    Ans: सतेज पाटील यांच्या गटाचे 13 आणि महायुतीचे 12 संचालक निवडून आले होते. त्यामुळे कोरम पूर्ण करण्यासंदर्भात वैधानिक अडचण निर्माण झाली होती.

  • Que: संजय राऊत यांच्यावर हसन मुश्रीफ यांनी काय टीका केली?

    Ans: संजय राऊत यांनी इतर पक्षांवर टीका करण्यापेक्षा आधी स्वतःच्या पक्षाची काळजी घ्यावी आणि पक्षातील खासदार-आमदारांची संख्या पाहावी, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.

Web Title: Gokul election hasan mushrif statement vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 05:09 PM

Topics:  

  • Gokul
  • Gokul Milk
  • Hasan Mushrif
  • kolhapur news
  • Satej Patil

संबंधित बातम्या

Gokul Milk Price Hike: अमूल-मदर डेअरीनंतर आता गोकुळ दूधही महागणार; दरात २ रुपयांची वाढ होणार?
1

Gokul Milk Price Hike: अमूल-मदर डेअरीनंतर आता गोकुळ दूधही महागणार; दरात २ रुपयांची वाढ होणार?

Gokul Election : गोकुळच्या मतमोजणीवेळी शरद पवारांचा सतेज पाटलांना फोन! नेमकं काय म्हणाले होते पवार?
2

Gokul Election : गोकुळच्या मतमोजणीवेळी शरद पवारांचा सतेज पाटलांना फोन! नेमकं काय म्हणाले होते पवार?

Kolhapur News: आरोग्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यात आरोग्यसेवेचा बोजवारा! गारगोटीतही महाडायलिसिस सेवा बंद, पुढे काय?
3

Kolhapur News: आरोग्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यात आरोग्यसेवेचा बोजवारा! गारगोटीतही महाडायलिसिस सेवा बंद, पुढे काय?

Gokul Election: ‘तुमचं पण दूध जातं का गोकुळात?’ पिट्याभाईचा राजकुमार तांगडेंना सवाल; सोशल मीडियावर रंगली जुगलबंदी
4

Gokul Election: ‘तुमचं पण दूध जातं का गोकुळात?’ पिट्याभाईचा राजकुमार तांगडेंना सवाल; सोशल मीडियावर रंगली जुगलबंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.