Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चार महिन्यांत ४० लाख भाविकांचा या यात्रेने रचला इतिहास

चारधाम यात्रेला आठवडाभरापूर्वी दररोज पाच हजार भाविक पोहोचत होते. आता या आठवड्याच्या सुरुवातीपासून हा आकडा २५ हजारांहून अधिक झाला आहे. चार महिन्यांत भाविकांची संख्या ४० लाखांच्या पुढे गेली असून हा एक विक्रम आहे. यापैकी सर्वाधिक ११ लाख भाविक केदारनाथला पोहोचले आहेत. यात्रेचा अवघा दीड महिना बाकी आहे.

  • By Ganesh Mate
Updated On: Sep 10, 2022 | 02:56 PM
चार महिन्यांत ४० लाख भाविकांचा या यात्रेने रचला इतिहास
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मुंबईतील नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाचे (Lalbaugcha Raja) आज मोठ्या थाटामाटात विसर्जन झाले. १० दिवसांत लालबागच्या राजाला लाखो भाविकांनी भेट दिली. अनेकांनी नवस फेडले. पण देशातल्या एका महत्त्वाच्या यात्रेने लालबागच्या राजासारखाच एक विक्रम रचला आहे.

चारधाम यात्रेला (Chardham Yatra) आठवडाभरापूर्वी दररोज पाच हजार भाविक (Devotees)  पोहोचत होते. आता या आठवड्याच्या सुरुवातीपासून हा आकडा २५ हजारांहून अधिक झाला आहे. चार महिन्यांत भाविकांची संख्या ४० लाखांच्या पुढे गेली असून हा एक विक्रम (Record) आहे. यापैकी सर्वाधिक ११ लाख भाविक केदारनाथला (Kedarnath) पोहोचले आहेत. यात्रेचा अवघा दीड महिना बाकी आहे.

केदारनाथला जाण्यासाठी प्रवाशांना त्यांची वाहने सोनप्रयाग येथे उभी करावी लागतात. गेल्या रविवारपर्यंत येथील वाहनतळ रिकामे होते; मात्र आता ते पूर्ण भरले आहे. सायंकाळी ५ वाजता गुप्तकाशी ते सीतापूर हा जाम रात्री ११ वाजता उघडला.

सोनप्रयागमधील एका हॉटेलचे मालक सांगतात की, त्यांच्या हॉटेलमध्ये दहा खोल्या आहेत. गेल्या आठवड्यात सर्व रिकाम्या होत्या. परंतु, आता बुकिंग ३० ऑक्टोबरपर्यंत फुल्ल आहे. यावर्षी मे-जूनमध्ये, जिथे चारधाम मार्गावरील हॉटेल रूमच्या किमती गगनाला भिडल्या होत्या, तिथे आता सामान्य खोलीचे भाडे १५०० रुपयांपर्यंत आहे.

पावसाळ्यानंतर ऑल वेदर रोडची अवस्था खराब आहे. दर ५ किमीवर डोंगराला तडे गेले असून रस्त्यावर दगड पडले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. ऋषिकेश ते व्यासीपर्यंत चार ठिकाणी डोंगर फुटून दगड रस्त्यावर आले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता अरुंद झाला आहे.

खराब हवामानामुळे हेली कंपन्यांनी सेवा बंद केली होती. या आठवड्यापासून ९ कंपन्यांनी सेवा सुरू केली असून आता सप्टेंबरपर्यंत बुकिंग फुल झाले आहे. ही हेलिकॉप्टर सेवा गुप्तकाशी ते केदारनाथ अशी आहे. त्याचे भाडे ७५०० रुपये प्रतिव्यक्ती आहे.

Web Title: New record in the history of chardham yatra so 40 lakh devotees in four months nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2022 | 02:56 PM

Topics:  

  • Kedarnath
  • Lalbaugcha Raja

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.