Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता म्युकरमायकोसिसचा नागपूर जिल्ह्यात हैदोस; ८४ टक्के रुग्ण एकट्या जिल्ह्यातून

पूर्व विदर्भातील (East Vidarbha) सहा जिल्ह्यांमध्ये आजपर्यंत आढळलेल्या म्युकरमायकोसिसच्या (काळी बुरशी) (mucomycosis ) (black fungus) एकूण रुग्णांपैकी ८३.९६ टक्के रुग्ण नागपूर जिल्ह्यातील आहेत. आजपर्यंत झालेल्या एकूण मृत्यूतील ९२ टक्के रुग्णांचे मृत्यूही नागपूर जिल्ह्यातच (Nagpur district) नोंदवले गेले आहेत.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jun 06, 2021 | 06:02 PM
आता म्युकरमायकोसिसचा नागपूर जिल्ह्यात हैदोस; ८४ टक्के रुग्ण एकट्या जिल्ह्यातून
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर (Nagpur). पूर्व विदर्भातील (East Vidarbha) सहा जिल्ह्यांमध्ये आजपर्यंत आढळलेल्या म्युकरमायकोसिसच्या (काळी बुरशी) (mucomycosis ) (black fungus) एकूण रुग्णांपैकी ८३.९६ टक्के रुग्ण नागपूर जिल्ह्यातील आहेत. आजपर्यंत झालेल्या एकूण मृत्यूतील ९२ टक्के रुग्णांचे मृत्यूही नागपूर जिल्ह्यातच (Nagpur district) नोंदवले गेले आहेत. त्यामुळे कोरोनानंतर (Corona) म्युकरमायकोसिसचे रुग्णही नागपूर जिल्ह्याच अधिक असल्याचे धक्कादायक वास्तव आरोग्य विभागाच्या (the health department) नोंदीतून पुढे आले आहे.

पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा या सहा जिल्ह्यांत आजपर्यंत म्युकरमायकोसिसचे १ हजार ४४१ रुग्ण आढळले आहेत. त्यातील सर्वाधिक १ हजार २१० (८३.९६ टक्के) रुग्न नागपूर जिल्ह्यातील आहेत. भंडाऱ्यात १३ (०.९० टक्के), चंद्रपूरला ८६ (५.९६ टक्के), गोंदियात ४१ (२.८४ टक्के), वर्धा जिल्ह्यात ९१ (६.३१ टक्के रुग्ण आढळले आहे. गडचिरोलीत मात्र एकही रुग्णाची नोंद नाही. पूर्व विदर्भात आजपर्यंत या आजाराचे १२० मृत्यू नोंदवण्यात आले.

त्यातील सर्वाधिक १११ मृत्यू (९२.५ टक्के) नागपूर जिल्ह्यातील, २ मृत्यू (१.६६ टक्के) चंद्रपूर जिल्ह्यातील, ४ मृत्यू (३.३३ टक्के) गोंदिया जिल्ह्यातील तर ३ मृत्यू (२.५ टक्के) वर्धा जिल्ह्यातील आहेत. आजपर्यंत गडचिरोली, भंडारा या दोन जिल्ह्यात एकही मृत्यूची नोंद नाही. दरम्यान, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या नोंदीनुसार, ४ जून २०२१ रोजी नागपुरात या आजाराचे ५२३, भंडारा १३, चंद्रपूर ५१, गोंदिया ३१, वर्धा ६७ सक्रिय रुग्ण विविध खासगी व शासकीय रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

१,०१५ रुग्णांवर शस्त्रक्रिया
पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत ४ जून २०२१ पर्यंत म्युकरमायकोसिसच्या १ हजार १५ रुग्णांवर विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सर्वाधिक ८९९ रुग्णांवर शस्त्रक्रिया नागपूर जिल्ह्यात, ४ शस्त्रक्रिया भंडाऱ्यात, ४४ शस्त्रक्रिया चंद्रपूरला, १८ शस्त्रक्रिया गोंदियात, तर ५० रुग्णांवर वर्धा जिल्ह्यात शस्त्रक्रिया करण्यात आल्या. उपचारानंतर ६३४ रुग्णांना विविध रुग्णालयांतून सुट्टी दिली गेली. त्यात नागपुरातील ५७६, भंडाऱ्यातील ३, चंद्रपुरातील ३३, गोंदियातील ५, वर्धा जिल्ह्यातील २४ रुग्णांचा समावेश असल्याचेही आरोग्य विभागाच्या नोंदीतून पुढे आले आहे.

Web Title: Now of myocardial infarction in nagpur district 84 percent of the patients are from the district alone nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2021 | 06:02 PM

Topics:  

  • Bhandara
  • Gadchiroli
  • Gondia District
  • Mucormycosis
  • आरोग्य विभाग

संबंधित बातम्या

Crime News: सौरपंपाची केबल चोरणारी टोळी सक्रिय; शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
1

Crime News: सौरपंपाची केबल चोरणारी टोळी सक्रिय; शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

Gadchiroli Crime: आंतरजातीय प्रेमविवाहानंतर पत्नीनेच प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या; अपघात वाटावा म्हणून मृतदेह…
2

Gadchiroli Crime: आंतरजातीय प्रेमविवाहानंतर पत्नीनेच प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या; अपघात वाटावा म्हणून मृतदेह…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.