Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालिका प्रशासनाच्या कामकाजावर आता ‘असान’चा वॉच; नगराध्यक्ष ‘ऍक्शन मोड’मध्ये…

पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त करत येत्या काळात प्रशासनाचा कारभार लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी स्वत:च्या संकल्पनेतून व स्वखर्चातून 'असान ऍप'ची निर्मिती केली.

  • By Navarashtra News Network
Updated On: Oct 22, 2021 | 04:00 PM
पालिका प्रशासनाच्या कामकाजावर आता ‘असान’चा वॉच; नगराध्यक्ष ‘ऍक्शन मोड’मध्ये…
Follow Us
Follow Us:

वाई : पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त करत येत्या काळात प्रशासनाचा कारभार लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी स्वत:च्या संकल्पनेतून व स्वखर्चातून ‘असान ऍप’ची निर्मिती केली. वाईकर नागरिकांच्या तक्रारींचा त्या-त्या दिवशी निपटारा व्हावा, यासाठी या ऍपची निर्मिती आहे. नगराध्यक्ष सावंत ‘ऍक्शन मोड’मध्ये आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

वाई नगरपालिकेकडून शहरातील नागरिकांच्या तक्रारी निवारणासाठी असान ऍपच्या निर्मितीविषयी माहिती देण्यासाठी नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी सर्व नगरसेवक व पालिका कर्मचारी व पत्रकार यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी नगरसेवक राजेश गुरव, महेंद्र धनवे, बाळासाहेब बागुल आदी मान्यवर उपस्थित होते.

वाई नगरपालिकेचे नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या संकल्पनेतून वाई नगरपालिकेने शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, कर वसुली, नागरी सेतू, घंटागाडी या पालिकेकडून पुरवण्यात येणाऱ्या सुविधांविषयी तक्रार करण्यासाठी असान ऍपची निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी व त्याचे तात्काळ निवारण करण्यात येणार आहे. शहरातील सर्व प्रभाग व लगतची नागरी वस्तीमधील नागरिकांना पालिकेच्या सर्वच सुविधा पोहोचत नाहीत. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत, काही ठिकाणी राजकीय विरोध, अपुरा कर्मचारी वर्ग, हद्दीचा वाद, व उद्धट अधिकारी अशा अनेक कारणास्तव काही भागात पालिकेच्या सोइ सुविधा पोहचू शकत नाही. त्यामुळे नागरिकांची पालिकेच्या कामकाजाबद्दल नाराजी वाढत आहे.

करदात्या नागरिकांनी आपली तक्रार कोणाकडे करायची हाच प्रश्न अनेकांना पडला होता. त्यावर उपाय म्हणून नगराध्यक्ष सावंत असान ऍपची एका खाजगी कंपनीकडून निर्मिती करून घेतली आहे. हे पालिका प्रशासन व नागरिक यांच्यामधील दुवा म्हणून हे ऍप काम करणार आहे.

Web Title: Now watch asan on the work of municipal administration mayor in action mode nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2021 | 04:00 PM

Topics:  

  • Action Mode
  • Wai

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.