nupur sharma
मुंबई : प्रेषित मोहम्मद यांच्यासंबंधी एका वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भाजपातून निलंबित करण्यात आलेल्या नुपूर शर्मा यांना नुकतेच भिवंडी पोलिसांनी समन्स बजावले होते. त्यानुसार त्यांना आज पोलीस ठाण्यात जबाबासाठी हजर राहावे लागणार होते. यावर नुपूर शर्मा यांनी आणखी चार आठवड्यांची मुदत पोलिसांकडे मागितली आहे. रविवारी रात्री उशीरा नुपूर शर्मा यांनी वकिलांमार्फत भिवंडी पोलिसांकडे ई-मेलद्वारे ही मुदत मागितली आहे(Nupur Sharma sends e-mail to Bhiwandi police in case of insult to Prophet Mohammad).
नुपूर शर्मा यांना मुदत द्यायची का, याबद्दल पोलिसांनी अद्याप निर्णय घेतला नाही. नुपूर शर्मा या भाजपच्या प्रवक्ता असताना त्यांना २७ मे या दिवशी एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या चर्चासत्राच्या कार्यक्रमात बोलविण्यात आले होते. या कार्यक्रमात त्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविरोधात एक आक्षेपार्ह विधान केले होते.
यांच्याविरोधात मुंबई, ठाण्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आक्षेपार्ह विधानानंतर शर्मा यांना भाजपामधून निलंबित करण्यात आले आहे. नूपुर शर्मा यांच्याविरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यातही मुस्लिम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणात त्यांना भिवंडी शहर पोलिसांनी समन्स बजावून त्यांना सोमवारी जबाबासाठी हजर राहण्यास सांगितले होते. रविवारी शर्मा यांनी याबाबत आणखी चार आठवड्यांची मुदत मागितली आहे. शर्मा यांच्या वकिलांनी त्यासंदर्भाचा ई-मेल पोलिसांना पाठविलेला आहे. पोलिसांनी मुदत वाढीबाबत अद्याप निर्णय घेतलेला नव्हता.
[read_also content=”या असल्या बाईला आई म्हणायच? पोटच्या मुलाला विकून खरेदी केला टीव्ही, फ्रीझ, वॉशिंग मशीन; पोलिसांनी अटक केल्यावर म्हणाली… https://www.navarashtra.com/crime/the-mother-sold-her-child-and-bought-a-tv-freezer-cooler-nrvk-290262.html”]
[read_also content=”जगातील सर्वात मोठं रहस्य उलगडलं; बर्म्युडा ट्रँगलमध्ये विमाने, जहाजे का गायब का होतात याचा खुलासा अखेर झाला https://www.navarashtra.com/viral/bermuda-triangle-mystery-solved-nrvk-278192.html”]
[read_also content=”‘येथे’ आजही धडधडते भगवान कृष्णाचे हृदय! वैज्ञानिकांनाही याचे रहस्य उमगले नाही https://www.navarashtra.com/viral/the-story-of-lord-jagannath-and-krishnas-heart-nrvk-280509.html”]
[read_also content=”एक महिला तब्बल 36 वर्षांपासून पुरुष म्हणून वावरली पण शेवटी… https://www.navarashtra.com/viral/woman-lives-in-the-guise-of-man-for-36-years-nrvk-280502.html”]