मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचा बुधवारी 22 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेसने नवी मोहीम हाती घेतली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी ‘एक पत्र मराठा युवकांच्या उज्ज्वल विष्यासाठी’ ही मोहीम राष्ट्रवादी युवकने हाती घेतली आहे. त्यानुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक कोटी पत्र पाठवणार असून मराठा आरक्षण देण्याची मागणी करणार आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी याबाबतची माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आजपर्यंत सर्व घटकांचा विचार केला आहे आणि करत आहे. हाच धागा पकडत व पक्षाचा विचार लक्षात घेऊन वर्धापन दिनी ही मोहीम राज्यभर राबविली जात आहे, असे मेहबूब शेख म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस एक कोटी पत्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवणार आहे. आपण सुद्धा युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक पत्र लिहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
[read_also content=”दोन चमचे बिअरमध्ये… https://www.navarashtra.com/latest-news/beer-good-for-the-face-give-it-a-try-nrvk-138996.html”]
[read_also content=”तुमची बर्थ डेट काय आहे? https://www.navarashtra.com/latest-news/people-born-on-these-dates-are-lucky-in-terms-of-money-nrvk-138985.html”]
[read_also content=”अशी मौत कुणाला येऊ नये https://www.navarashtra.com/latest-news/husband-and-wife-die-due-to-electric-shock-in-bid-nrvk-138972.html”]