Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘काश्मिर फाइल्स’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात! प्रदर्शनाला स्थगितीसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

सध्या अनेक राज्यांमध्ये निवडणुका होत असताना, राजकीय पक्षांकडून या मुद्याचा गैरवापर होण्याची शक्यता असून त्यामुळे सर्वत्र जातीय हिंसाचारात वाढू शकते.

  • By Smita Manjrekar
Updated On: Mar 14, 2022 | 03:31 PM
anupam kher the kashmir files

anupam kher the kashmir files

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई, काश्मिरी पंडितांच्या जीवनावर आधारित ‘काश्मीर फाइल्स’ (Kashmir Files) चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात उच्च न्यायालयात (high court) जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याची दखल घेत खंडपीठाने मंगळवारी तातडीने सुनावणी निश्चित केली आहे.

‘काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट १९८९ आणि १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या झालेल्या स्थलांतरावर भाष्य करतो. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे. चित्रपटाचा ट्रेलरवरून नुकताच प्रदर्शित झाला. आता त्यावर आक्षेप घेत उत्तर प्रदेशचे रहिवासी इंतेझार हुसैन सय्यद यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवरून सदर चित्रपट मुस्लिमांनी काश्मिरी पंडितांच्या केलेल्या हत्येवर आधारित आहे. ज्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता असल्याचे याचिकेत म्हटले आहे. संपूर्ण चित्रपटात त्या काळात घडलेल्या घटनांवर एकतर्फी भाष्य करण्यात आले आहे. ज्यामुळे हिंदू समुदायाची माथी भडकू शकतत आणि देशभरात हिंसाचार घडू शकतो. सध्या अनेक राज्यांमध्ये निवडणुका होत असताना, राजकीय पक्षांकडून या मुद्याचा गैरवापर होण्याची शक्यता असून त्यामुळे सर्वत्र जातीय हिंसाचारात वाढू शकते. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची तसेच याचिकेवर सुनावणी होईपर्यंत चित्रपटाचा ट्रेलर त्वरित काढून टाकावा, अशी विनंती याचिकाकर्त्याकडून करण्यात आली आहे.

त्यावर सोमवारी मुख्य न्या. दिपांकर दत्ता आणि न्या. विनय जोशी यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी पार पडली. तेव्हा, याचिकेची दखल घेत खंडपीठाने मंगळवारी तातडीने सुनावणी निश्चित केली.

विवेक अग्निहोत्री यांनी ‘काश्मीर फाइल्स’ दिग्दर्शन केले असून त्यात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher), मिथून चक्रवर्ती, पल्लवी जोशी (Pallavi Joshi) यांच्यासारखी स्टारकास्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे. येत्या ११ मार्चला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Pil filed in high court seeking to stall release of kashmir files nrsm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2022 | 03:28 PM

Topics:  

  • Anupam Kher
  • kashmir files
  • mithun chakraborty
  • Mumbai High Court

संबंधित बातम्या

Dilwale Dulhaniye Le Jayenge : महाराष्ट्रातील ‘या’ रेल्वे स्थानकाला घोषित करा पर्यटन स्थळ! Anupam Kher यांची शासनाकडे विशेष मागणी
1

Dilwale Dulhaniye Le Jayenge : महाराष्ट्रातील ‘या’ रेल्वे स्थानकाला घोषित करा पर्यटन स्थळ! Anupam Kher यांची शासनाकडे विशेष मागणी

Anupam Kher : ‘जिथे राजने सिमरनचा हात धरला…’ त्या ऐतिहासिक ठिकाणी पोहोचले अनुपम खेर; महाराष्ट्र सरकारकडे केली खास मागणी
2

Anupam Kher : ‘जिथे राजने सिमरनचा हात धरला…’ त्या ऐतिहासिक ठिकाणी पोहोचले अनुपम खेर; महाराष्ट्र सरकारकडे केली खास मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.