Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिल्ह्यात पावसाची दगाबाजी; बियांचे कोंब वाळू लागल्याने शेतकरी चिंतेत

ऐन रोवणीच्या दिवसात पाऊस रुसल्याने जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. नर्सरीतील पऱ्हे सुकायला लागली असून प्रत्येक दिवस कोरडा उगवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली असून प्रकल्पाचे पाणी सोडण्यासाठी होतकरी आक्रमक होत आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jul 18, 2021 | 09:32 PM
जिल्ह्यात पावसाची दगाबाजी; बियांचे कोंब वाळू लागल्याने शेतकरी चिंतेत
Follow Us
Close
Follow Us:

भंडारा (Bhandara). ऐन रोवणीच्या दिवसात पाऊस रुसल्याने जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. नर्सरीतील पऱ्हे सुकायला लागली असून प्रत्येक दिवस कोरडा उगवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली असून प्रकल्पाचे पाणी सोडण्यासाठी होतकरी आक्रमक होत आहे. पावसाने अशीच विश्रांती घेतली तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येण्याची दाट शक्‍यता आहे.

[read_also content=”चंदौली/ रेल्वेखाली बसून नटबोल्ट कसत होता; अचानक गाडी सुरू झाली आणि… ; व्हिडिओ व्हायरल https://www.navarashtra.com/latest-news/sitting-under-the-train-was-tightening-the-nutbolt-suddenly-the-train-started-and-video-goes-viral-nrat-157634.html”]

भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. धानपिकासाठी मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्‍यकता असते. जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान १३३०.२ मिमी आहे. जून आणि जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाला की धान रोवणीला सुरुवात होते. धानपिकासाठी प्रथम नर्सरी तयार करावी लागते. त्यालाही पाण्याची आवडयकता असते. तसेच जोरदार पाऊस झाल्यानंतर रोवणीला प्रारंभ होतो. साधारणत: जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून रोवणी केली जाते. परंतु यंदा पावसाने सुरुवातीला शेतकऱ्यांना हिरवे स्वप्न दाखविले. त्यानंतर पाऊस मात्र बेपत्ता झाला. कधीमधी पाऊस बरसत असला तरी हा पाऊस धानपिकासाठी पोषक नाही.

गत १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. सर्व शेतकऱ्यांच्या नजरा आकाझाकडे लागल्या आहेत. जिल्ह्यातील साधारणत: २५ टक्के क्षेत्रात धानाची रोवणी झाली आहे. यावर्षी १ लाख ८३ हजार हेक्‍टरवर धानपिकाचे नियोजन आहे. त्यात १३ हजार ५५९ हेक्‍टर क्षेत्रावर नर्सरी तयार करण्यात आली होती. परंतु आता पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी ओलिताचा प्रयत्न करीत आहेत. परंतु कोरडवाहू शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न आहे. त्यातच प्रचंड ऊनही तापत आहे. त्यामुळे रोवणी झालेले पऱ्हे माना टाकत आहेत. अशीच स्थिती कायम राहिली तर शेतकऱ्यांना दुबार पेरणीशिवाय पर्याय राहणार नाही.

भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत ४४६.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. १ जून ते १७ जुलै या कालावधीत ४३७ मिमी पाऊस अपेक्षित असतो. तसे पाहता सरासरीच्या १०२ टक्के पाऊस झाला आहे. परंतु हा पाऊस काही सलग झाला नाही. आठवड्यातून एक-दोन दिवस जोरदार पाऊस बरसला. त्यानंतर उन्ह तापत असल्याने अनेक ठिकाणी नर्सरीच्या जमिनीला तडे जात आहेत. डोळ्यादेखत पीक वाळत आहे तर दुसरीकडे प्रकल्पांमध्ये मुबलक पाणी आहे. शेतकरी प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी वारंवार करीत आहे. परंतु अद्यापही प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी सोडण्यात आले नाही.

एकंदरीत दरवर्षी संकटाचा सामना करणाऱ्या डोतकऱ्यांना यंदाही संकटाला सामोरे जावे लागण्याचे चिन्ह दिसत आहेत. दररोज कडक उन्ह तापत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे. कधी पाऊस पडतो याची प्रतीक्षा आहे.

हवामान खात्याचा अंदाज चुकला
मे महिन्यात हवामान खात्याने अंदाज वर्तविला तेव्हा चांगला पाऊस कोसळणार असे सांगितले होते. मृग नक्षत्राच्या सुरुवातीपासून दमदार पावसाचे आगमनही झाले. त्यानंतर मात्र पाऊस विश्रांती घेऊ लागला. सर्वदूर अपेक्षित पाऊस कोसळत नसल्याने आता शेतकरी हवामान खात्यावर टीका करताना ग्रामीण भागात दिसत आहेत.

जुलै महिन्यातील १७ दिवसात अपवाद वगळता कुठेही दमदार पाऊस झाला नाही. नदी-नाल्यांना प्रवाह मिळाला. परंतु पावसाला नियमित जोर दिसत नाही. अपेक्षित पाऊस पडत नसल्याने वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे. विषाणूजन्य रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. आधीच कोरोनाचे सावट त्यात पाऊस बेपत्ता यामुळे सर्व शेतकरी चिंतेत आहेत.

Web Title: Rain fraud in bhandara district farmers worried as seed shoots start to dry nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2021 | 09:32 PM

Topics:  

  • Crisis on farmers

संबंधित बातम्या

कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना विचारला ‘तो’ प्रश्न; संजय राऊत म्हणाले, ‘कोकाटे म्हणजे कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा’
1

कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना विचारला ‘तो’ प्रश्न; संजय राऊत म्हणाले, ‘कोकाटे म्हणजे कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.