Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News : प्रामाणिक कर्जदार शेतकऱ्यांवर अन्याय, शासनाच्या कर्जमाफीच्या निकषांवरून संताप

कर्ज थकवणाऱ्यांना लाखो रुपयांची माफी आणि प्रामाणिक राहणाऱ्यांना केवळ ५० हजारांचे प्रोत्साहन, हा प्रामाणिकपणाचा सन्मान की शिक्षा? असा संतप्त सवाल चांदवड तालुका पाणीप्रश्न संघर्ष समितीचे व्यक्त केला.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 10, 2026 | 05:30 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी
  • वेळेवर पैसे फेडणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा नाहीच
  • शेतकरी संघटनांची आक्रमक भूमिका
Nashik News : राज्य सरकारने जाहीर केलेली दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी पहिल्या नजरेत दिलासादायक वाटत असली, तरी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये यामुळे तीव्र नाराजी पसरली आहे. कर्ज थकवणाऱ्यांना लाखो रुपयांची माफी आणि प्रामाणिक राहणाऱ्यांना केवळ ५० हजारांचे प्रोत्साहन, हा प्रामाणिकपणाचा सन्मान की शिक्षा? असा संतप्त सवाल चांदवड तालुका पाणीप्रश्न संघर्ष समितीचे अॅड. भरत मुरलीधर ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

Nashik News : म्हाडा योजनेत कोट्यवधींचा घोटाळा, बिल्डरांकडून शासनाची फसवणूक

वेळेवर पैसे फेडणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा नाहीच

ग्रामीण भागात अनेक शेतकरी प्रतिकूल परिस्थितीतही बँकिंग शिस्त पाळतात. पिकांना भाव नसताना, दुष्काळ असताना किंवा बाजारात नुकसान सोसूनही हे शेतकरी आपली पत जपण्यासाठी प्रयत्नशील असतात. प्रसंगी घरची जनावरं विकून, दागिने तारण ठेवून किंवा खाजगी सावकाराकडून कर्ज काढून ते बँकेचा हप्ता वेळेवर भरतात. मात्र, सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे कर्ज थकवणाऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतचा फायदा मिळत असताना, वेळेवर पैसे भरणाऱ्यांना फक्त ५० हजार रुपयांवर समाधान मानावे लागत आहे. हा भेदभाव प्रामाणिक शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्याचे अॅड. ठाकरे यांनी म्हटले आहे.

काय असावे कायमस्वरूपी धोरण?

• केवळ कर्जमाफी हाच एकमेव पर्याय नसून सरकारने शाश्वत धोरणांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे अॅड. ठाकरे यांनी सुचवले आहे. यात प्रामुख्याने नियमित कर्जफेड करणाऱ्यांना अधिक मोठे प्रोत्साहन देणे, शेतीमालाला रास्त हमीभाव मिळवून देणे, विमा संरक्षण आणि बाजारव्यवस्था अधिक मजबूत करणे, शेतीसाठी दीर्घकालीन आणि ठोस धोरणे आखणे या आहेत.
• अशा उपाययोजनांमुळे शेतकरी कर्जमाफीवर अवलंबून न राहता स्वत:च्या हिमतीवर सक्षम होऊ शकेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

शेतकरी संघटनांची आक्रमक भूमिका

वारंवार दिल्या जाणाऱ्या कर्जमाफीमुळे शेती क्षेत्रातील ‘नैतिक जोखीम’ वाढण्याची भीती अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कर्ज फेडण्यापेक्षा ते थकवले तरच सरकारकडून मोठी मदत मिळते, असा चुकीचा संदेश यातून जात आहे. यामुळे भविष्यात शेतकरी कर्ज फेडण्याऐवजी माफीची वाट पाहण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट परिणाम बँकिंग व्यवस्थेच्या मजबूतीवर होऊ शकतो. राज्यातील विविध शेतकरी संघटनांनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे. बँकिंग प्रणाली जीवंत ठेवण्यात नियमित कर्ज भरणाऱ्यांचा मोठा वाटा असतो. जर सरकारला मदत करायचीच असेल, तर दोन्ही गटांना समान न्याय मिळायला हवा, अशी मागणी जोर धरत आहे. नियमित कर्जदारांना डावलल्यामुळे त्यांच्यातील उत्साह कमी होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Nashik News : हुल्लडबाजांची खैर नाही; चोख पोलिस बंदोबस्ताचे नियोजन

Web Title: Nashik farmers protest loan waiver criteria

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • Benefit to farmers
  • Crisis on farmers
  • farmer
  • Nashik

संबंधित बातम्या

Wardha Farmer : सिंचन विहिरीचे अनुदान २७ महिन्यांपासून रखडले; शेतकऱ्याचा आत्महत्येचा इशारा, प्रशासनाची धावपळ
1

Wardha Farmer : सिंचन विहिरीचे अनुदान २७ महिन्यांपासून रखडले; शेतकऱ्याचा आत्महत्येचा इशारा, प्रशासनाची धावपळ

Farmmers Impact On Kharif Crops : शेतकऱ्यांच्या उत्पादनावर घट, खरीप पिकांवर मोठा परिणाम…..
2

Farmmers Impact On Kharif Crops : शेतकऱ्यांच्या उत्पादनावर घट, खरीप पिकांवर मोठा परिणाम…..

Nashik News: दणका! ३६ गणेश मंडळांवर कारवाईचे संकट ; आता न्यायालयात होणार भवितव्याचा फैसला
3

Nashik News: दणका! ३६ गणेश मंडळांवर कारवाईचे संकट ; आता न्यायालयात होणार भवितव्याचा फैसला

Maharashtra Drought: जावळीचा Trigger-1 मध्ये समावेश करा; दुष्काळी सवलतींसाठी शिवसेनेची मागणी
4

Maharashtra Drought: जावळीचा Trigger-1 मध्ये समावेश करा; दुष्काळी सवलतींसाठी शिवसेनेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.