Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

समुद्रातील दुर्मिळ जीवाश्मांचा शोध लागला; चंद्रपूरमधील भूशास्त्रज्ञाचे सुयश, सविस्तर…

शहरालगतच्या ग्रामीण भागात प्राचीन काळात समुद्रात तयार झालेले विविध चुनखडक आढळतात. याच चुनखडकात २०० ते १५० कोटी वर्षांच्या निओप्रोटोरोझोईक (Neoproterozoic) काळात इथे असलेल्या समुद्रात पृथ्वीवर प्रथम विकसित झालेल्या सायनोबॅक्टेरीया (स्ट्रोमाटोलाईट) (Stromatolite) या सूक्ष्म जिवांचे चुनखडकातील अतिशय दुर्मीळ जीवाश्म सापडले आहेत.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jun 17, 2021 | 09:43 PM
समुद्रातील दुर्मिळ जीवाश्मांचा शोध लागला; चंद्रपूरमधील भूशास्त्रज्ञाचे सुयश, सविस्तर…
Follow Us
Follow Us:

वणी (Vani) : शहरालगतच्या ग्रामीण भागात प्राचीन काळात समुद्रात तयार झालेले विविध चुनखडक आढळतात. याच चुनखडकात २०० ते १५० कोटी वर्षांच्या निओप्रोटोरोझोईक (Neoproterozoic) काळात इथे असलेल्या समुद्रात पृथ्वीवर प्रथम विकसित झालेल्या सायनोबॅक्टेरीया (स्ट्रोमाटोलाईट) (Stromatolite) या सूक्ष्म जिवांचे चुनखडकातील अतिशय दुर्मीळ जीवाश्म सापडले आहेत. चंद्रपूर येथील पर्यावरण आणि भूशास्त्र अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी हे दुर्मीळ जीवाश्म शोधून काढले आहेत. (The-first-fossil-of-life-on-earth-found-in-Yavatmal)

[read_also content=”हिंगणघाट/ रस्ते, पूल बांधकामामुळे वर्धा जिल्ह्याच्या विकासाला गती; मंत्री नितीन गडकरी https://www.navarashtra.com/latest-news/accelerate-the-development-of-wardha-district-due-to-construction-of-roads-and-bridges-minister-nitin-gadkari-nrat-143787.html”]

पृथ्वीची उत्पत्ती ४.६ अब्ज वर्षांपूर्वी झाली. परंतु, सजीवांची उत्पत्ती मात्र ३ ते ४ अब्ज वर्षादरम्यान झाली. जगात काही ठिकाणीच असे जीवाश्म सापडले आहेत. त्यांना स्ट्रोमाटोलाईट असे म्हणतात. विदर्भातील चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात १५० ते २०० कोटी वर्षांच्या निओप्रोटेरोझोईक काळात तयार झालेल्या चुनखडकात हे जीवाश्मे आढळतात.

तेव्हा समुद्राच्या उथळ उष्ण पाण्यात तयार झालेल्या चिखलात हे जिवाणू विकसित झाले. ते पृथ्वीवरील प्रथम विकसित झालेली जीव होती. ही सर्व आदीजीव खनिजे खाऊन जगत होती. पुढे अशाच जिवांपासून बहुपेशीय जीव विकसित होत गेले. मासोळ्या, सरपटणारे जीव, विशाल आकाराचे डायनोसोर ते पुढे मानव असा सजीवांचा विकास झाला.

चंद्रपूर आणि वणी परिसरात चांदा, बिल्लारी आणि पेनगंगा ग्रुपच्या चुनखडकात स्ट्रोमेटोलाईटची जीवाश्मे आढळली. या सजीवांना शास्त्रीय भाषेत कुकोकल्स आणि ओकटोरीअल्स असे म्हणतात. ही जीवाश्मे चिखलात गोल आकाराची गुंडाळी करून समूहाने राहत होती. क्रिटाशिअस काळात भूगर्भीय घडामोडीमुळे चिखलांचे रूपांतर चुनखडकात झाले आणि जिवांचे रूपांतर जीवाश्मात झाले. करोडो वर्षांनंतरही चुनखडकात सजीवांच्या प्रतिमा दिसतात.

वणी शहर जीवाश्मांसाठी जगभरात प्रसिद्ध
चुनखडकात आढळलेली ही अतिशय महत्त्वाची स्ट्रोमाटोलाईटची जीवाश्मे प्रथमच आढळली आहेत. दोन वर्षांपासून ते ही जीवाश्मे शोधत होते. प्रथम आस्ट्रेलियामध्ये ही जीवाश्मे मोठ्या प्रमाणावर आढळली होती. भारतात भोजुंदा, राजस्थान, चित्रकुट, मध्य प्रदेश, चंद्रपूर येथे आढळली आहेत. या संशोधनामुळे वणी शहराचे नाव जगभर पोहोचेल. जीवाश्मांच्या संशोधनामुळे जीवशास्त्र, भूशास्त्र आणि जीवाश्म शास्त्राच्या अभ्यासाला चालना मिळेल असा विश्वास प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केला.

Web Title: Rare fossils of the sea were discovered a geologist from chandrapur discovered detailed nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2021 | 09:43 PM

Topics:  

  • Fossils

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.