रसमलाई (Rasmalai Recipe) नाव घेतल्यानंतर तोंडाला पाणी सुटलं ना. रसमलाई म्हण्टलं की डोळ्यासमोर गोड दुधात बुडवलेले पनीर किंवा खव्याचे गोळे. रसमलाई हा एक गोड पदार्थ आहे. रसमलाई म्हणजे पनीर चांगले मळून त्याचे गोळे बनवले जातात आणि ते साखरेच्या पाण्यामध्ये शिजवले जातात आणि दुधापासून बनवलेली बासुंदी किंवा रबडी मध्ये घालून सर्व्ह केले जातात. आजकालच्या रेडीमेड मिळत असताना रेडीमेट पॅकेट पासून रसमलाई रेसिपी कशी बनवायची.
साहित्य :
कृती :
प्रथम Gits च्या रसमलाई पॅकेट ,अधिक A पॅकेट परातीत फोडून त्यात १ चमचा तूप घालून एकजीव करून घ्यावं. आता यात ¼ कप दूध घालून चांगले मळून घ्यावं. तयार पिठाचे पेढ्या इतके गोळे करून रसमलाईचा आकार द्यावा. आता कढईत पाणी गरम करून त्यात हे गोळे सोडावे आणि १० min चांगले उकडू द्यावे. एकाबाजूला १ कप साखरेला १½ कप पाणी घेऊन साखरेचा गुलाबजाम सारखा पाक तयार करावा. पाक नंतर थंड करावा आणि तयार उकडलेले रसमलाई गोळे पाकात सोडावे.आता कढईत उरलेले दूध घेऊन त्यात B पॅकेट घोळून मध्यमाचेवार दूध घट्ट होईपर्यंत तयार करावे. त्यानंतर पाकातले गोळे दुधात सोडावे आणि फ्रिजमध्ये थंड करून घ्यावे. अशाप्रकारे रसमलाईची स्वादिष्ट रेसिपी झटपट तयार होते.