Recipe : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तोंड गोड करा, शाही पद्धतीने घरी बनवा ‘नवाबी सेवया’
Nawabi Seviyan Recipe : शाही मिठाईची चवंच न्यारी, तुम्ही कधी नवाबी सेवई खाल्ली आहे का? रिच चव, मऊ टेक्श्चर आणि याचा गोड सुगंध सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. फक्त चावीलाच नाही तर दिसायलाही हा पदार्थ फार आकर्षित दिसतो.
नवीन वर्षाची सुरुवात खास करायची असेल तर गोड पदार्थ उत्तम पर्याय आहे.
या गोड पदार्थालाही जर शाही टच दिला तर याची मजाच न्यारी.
आज आपण जाणून घेणार आहोत एका शाही मिठाईची रेसिपी.
नवाबी सेवया हा एक पारंपरिक, समृद्ध आणि सुगंधी गोड पदार्थ असून त्याचा उगम मुघलकालीन नवाबी स्वयंपाकशैलीत आढळतो. या पदार्थात दूध, तूप, केशर, सुकामेवा आणि सेवयांचा सुंदर मिलाफ असतो. साध्या सेवयांपेक्षा नवाबी सेवयांची खासियत म्हणजे त्याची रिच चव, मऊसर पोत आणि सुगंधी गोडवा. सण-उत्सव, ईद, खास पाहुण्यांसाठी किंवा घरच्या घरी काहीतरी खास बनवायचे असेल, तर नवाबी सेवया हा उत्तम पर्याय ठरतो. योग्य प्रमाणात शिजवलेले दूध, मंद आचेवर परतवलेली सेवया आणि सुकामेव्याची भरपूर सजावट यामुळे हा पदार्थ अगदी शाही वाटतो. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने, हॉटेलसारख्या चवीच्या नवाबी सेवया ही रेसिपीघरी कशी तयार करायची ते जाणून घेऊया.