
अभिनेत्री जिनिलिया डिसूजा देशमुख सोशल मिडीयावर चांगलीच सक्रीय असते. रितेश देशमुख आणि मुलांसोबतचे अनेक धम्माल व्हिडीओ ती शेअर करते. जिनिलिया आणि रितेश (Genelia and ritesh deshmukh)हे सेलिब्रिटी वर्तुळातलं सर्वात गोड कपल मानलं जातं. दोन मुलांसोबत त्यांचा सुखी संसार सुरु असल्याचं चित्र नेहमीच पाहायला मिळतं. दोघंही भन्नाट आहेत, याची प्रचिती वेळेवेळी सोशल मिडीयावर येते.
नेहमीप्रमाणेच एक भन्नाट व्हिडीओ रितेश देशमुखने इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. आज 14 फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन्स डे. (valentine day) आजच्या दिवशी आपल्या लाडक्या व्यक्तीजवळ आपण प्रेम व्यक्त करतो. याच दिवसानिमित्ताने बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने पत्नी जिनिलियाला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देत एक व्हिडीओ शेअर केला आहे. पण त्यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर रितेशने नक्की शुभेच्छा दिल्या आहेत की ? त्या दोघांमध्ये काही बिनसलं आहे असा प्रश्न समोर येत आहे. दरम्यान, त्यांचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.हा व्हिडीओ शेअर करत ‘हॅपी व्हेलेंटाईन डेच्या हार्दिक शुभेच्छा’, असे कॅप्शन रितेशने दिले आहे.