
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानने त्याचा 60 वा वाढदिवस नुकताच मोठ्या थाटात साजरा केला. भाईजानने पनवेलच्या फार्महाऊसवर वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन केले आहे. यावेळी या पार्टीला बॉलिवूड, दक्षिण भारतीय चित्रपट आणि अनेक प्रमुख कलाकार उपस्थित होते. सलमान खानच्या या पार्टीत मराठमोळं कपल रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखनेही हजेरी लावली होती. सध्या सोशल मीडियावर पार्टीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यात सलमान खानची अनोखी शैली दाखवण्यात आली आहे.
अभिनेत्री जिनिलिया देशमुखने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान स्वत: सगळ्यांसाठी भेळ बनवत आहे. भाईजानचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सलमान भेळ बनवत असताना त्याच्या समोर रितेश उभा आहे. भाईजानने दिलेली भेळ पाहून रितेश म्हणतो, “भाऊंची भेळ”. हा व्हिडीओ पाहून चाहतेही चकित झाले आहे. “सलमान भाऊसारखं कोणीच नाही. तुम्हाला स्पेशल फील करवून देण्यासाठी तो काहीही करू शकतो. यावेळी त्याने खूपच चविष्ट भाऊंची भेळ बनवली. आमच्याकडून खूप प्रेम”, असं जिनिलियाने व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे.
‘Jabrat’मध्ये पाहायला मिळणार महाराष्ट्राची खास लावणी, हिंदवी पाटील – सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड
रितेश देशमुख आणि सलमान खान यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून खूप घट्ट मैत्री आहे. अलिकडेच रितेशने बिग बॉस 19 च्या मंचावर उपस्थिती लावली होती. यावेळी रितेश आणि सलमान खानचे बॉण्डिंग पाहायला मिळाले. सलमान खानच्या वाढदिवशी रितेशने एक खास पोस्ट केली होती. त्या दोघांचे फोटो पोस्ट करून सलमान खानला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा देखील दिल्या होत्या.
रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले आहे आणि हा चित्रपट १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिवसानिमित्त प्रदर्शित होणार आहे. या ऐतिहासिक सिनेमात सलमान खान लहानशा पण महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर सुरू आहेत. सलमानला पापाराझींनी सुद्धा ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या सेटवर पाहिलं होतं.