Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओमायक्रॉनच्या रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयाची तयारी; १४ बेडचा कक्ष तीन डॉक्टर व पाच परिचारिकांसह सज्ज

जगभरातील अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. राज्य शासनानेही खबरदारीचा उपाय म्हणून परदेशातून येणाऱ्या नागरिकांवर लक्ष केंद्रित केले आहे. आरोग्य विभागालाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. त्यानुसार संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्ह्यातही खबरदारी घेण्यात येत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 01, 2022 | 06:56 PM
ओमायक्रॉनच्या रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयाची तयारी; १४ बेडचा कक्ष तीन डॉक्टर व पाच परिचारिकांसह सज्ज
Follow Us
Close
Follow Us:

सातारा : परदेशातून आलेल्या नागरिकांमध्ये ओमिक्रॉनचे ६ रुग्ण जिल्ह्यात आढळल्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला. त्याचाच एक भाग म्हणून नव्या व्हायरसने बाधित झालेल्यांवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातील एक आयसीयू वॉर्ड राखीव ठेवण्यात आला आहे.

जगभरातील अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. राज्य शासनानेही खबरदारीचा उपाय म्हणून परदेशातून येणाऱ्या नागरिकांवर लक्ष केंद्रित केले आहे. आरोग्य विभागालाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. त्यानुसार संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्ह्यातही खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने परदेशातून आलेल्या नागरिकांचे होम आयसोलेशन व आरटीपीसीआर चाचणीवर भर दिला जात आहे. गेल्या २० दिवसांत जिल्ह्यामध्ये विविध देशांतून ५०३ नागरिक आले आहेत. या नागरिकांचा शोध घेऊन त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे, तसेच आरेाग्य विभागाकडून या नागरिकांच्या गृहविलगीकरणाकडे लक्ष ठेवले जात आहे.

आणखी काही जणांना बाधा

या प्रक्रियेच्या माध्यमातूनच फलटण तालुक्यात युगांडा या देशातून आलेल्या नागरिकांची तपासणी झाली. कोरेाना पॉझिटिव्ह आल्यानंतर व्हायरस कोणता आहे, याच्या तपासणीसाठी त्यांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले होते. त्यामध्ये तीन नागरिकांना ओमिक्रॉनची बाधा झाल्याचे समोर आले. हे नागरिक पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. फलटणचे बाधित आल्यानंतर झालेल्या इतर नागरिकांच्या तपासणीत परदेशातून आलेले आणखी काही जणांना ओमिक्रॉनची बाधा झाली असण्याचा संशय वैद्यकीय अधिकाऱ्यांना आहे. त्यानुसार संबंधितांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही.

एक आयसीयू बेड राखीव

ओमिक्रॉनबाधित असल्याचा नवा रुग्ण अद्याप समोर आलेला नसला तरी, जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाने मात्र असे रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर योग्य ते उपचार तातडीने करता यावेत, यासाठी तयारी केली आहे. ओमिक्रॉनचे रुग्ण हे अन्य कोरोना बाधित रुग्णांसोबत ठेवले जाणार नाही. त्यातून कोरोनाच्या रुग्णांना ओमिक्रॉनचा संसर्ग होऊ नये याची खबरदारी घेतली जाणार आहे.

दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील तीन अतिदक्षता विभागांपैकी एक १४ बेडची व्यवस्था असलेला एक आयसीयू ओमिक्रॉनच्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर या रुग्णांना कशाप्रकारे उपचार द्यायचे, कोणती दक्षता घ्यायची याबाबतची माहितीही आरोग्य विभागाने घेतली आहे.

Web Title: Satara district hospital is prepared for omicron infected patients nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2022 | 06:56 PM

Topics:  

  • Satara District Hospital

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.