सांगली : वीस वर्षात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करता आला नाही त्यांनी भाजपची चिंता करू नये त्याचे 54 आमदार कमी होऊ नयेत,म्हणून शरद पवार वारंवार भाजपची सत्ता येणार नाही असं सांगत आहेत, डबल एक्स शरद पवारांनी भाजपचे चिंता करू नये आपले आमदार फुटू नयेत याची काळजी करावी,असा टोला आमदार गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते(Sharad Pawar should not worry about BJP, his MLAs should not split; Criticism of MLA Gopichand Padalkar).
देशातील चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपने विजय मिळवलेला आहे. या विजयानंतर महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनाची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये भाजपाचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार असा दावा केला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आपण आहे तो पर्यंत भाजपची सत्ता येऊ देणार नाही असे वक्तव्य केले आहे.
यावर भाजपाचे प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झालेली आहे आणि महाराष्ट्रात अद्याप ए राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला नाही पावसात भिजून देखील 54 त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या गेली नाही, केरळ भाजपचे आमदार फुटणार अशी वारंवार चर्चा केली जाते मात्र अद्याप एकही आमदार फुटलेला नाही मात्र आता देशातल्या अनेक राज्यांमध्ये भाजपची एक हाती सत्ता येत आहे आणि अशा परिस्थिती मध्ये आपल्या 54 आमदारांपैकी कोणीही फुटू नाही म्हणून शरद पवार वारंवार महाराष्ट्रात भाजपाची सत्ता येणार नाही,असं वक्तव्य करत आहेत. पण त्यांनी भाजपची चिंता करू नये,आपल्या पक्षाची चिंता करावी,आणि आपले आमदार फुटू नयेत याची काळजी करावी ,असा टोला लगावला आहे.
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]






