ब्लूमिंगडेल्स प्री-प्रायमरीचा ४५वा वर्धापनदिन तसेच जसूबेन एमएल स्कूलचा ४४वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी भारतीय टपाल खात्याने खार शाळेच्या आवारांमध्ये दोन स्पेशल कव्हरचे प्रकाशन केले. आमदार.आशिष शेलार, डॉ. दीपशीखा बिर्ला, माजी नगरसेविका अलका केळकर, जीआरएसचे विश्वस्त आणि दमयंती भट्टाचार्य यांच्या हस्ते स्पेशल कव्हरचे अनावरण करण्यात आले.
मुंबईतील आघाडीच्या आयसीएसई शाळांपैकी एक
१९७९ मध्ये पूर्वप्राथमिक शाळा म्हणून स्थापन झालेली ब्लूमिंगडेल्स प्री-प्रायमरी एनईपी-२०२० अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करणाऱ्या पहिल्या शाळांपैकी एक आहे. १९८० मध्ये जेएमएल शाळाही सुरू झाली आणि तेव्हापासून आत्तापर्यंत ही मुंबईतील आघाडीच्या आयसीएसई शाळांपैकी एक आहे.ब्लूमिंगडेल प्री-प्रायमरीसाठी कव्हरमध्ये शाळेच्या ४५ वर्षांच्या कार्यसंचालनांचा समावेश आहे, तर जेएमएल स्कूलसाठी कव्हरमध्ये त्यांची इमारत, ४४ वर्षांचे कार्यसंचालन, तसेच शिक्षण व चारित्र्याचे प्रतिनिधीत्व करणारे त्यांचे बोधवाक्य ‘ज्ञान चारित्र्यासह शोभून दिसते’ यांचा समावेश आहे.
आशिष शेलार यांनी शाळेसाठी गौरवोद्गार
वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार व भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष अॅडव्होकेट आशीष शेलार शाळेने शिक्षण क्षेत्रात दिलेल्या दीर्घकालीन योगदानाबद्दल म्हणाले, ”मी शाळेचे ३ कारणांसाठी अभिनंदन करतो – हे स्पेशल कव्हर प्रकाशित करत भारतीय टपाल विभागामध्ये अधिकृत मान्यता मिळवण्यासाठी, संस्थेने केलेल्या योगदानासाठी भारत सरकारच्या रेकॉर्डमध्ये योग्य स्थान मिळवण्यासाठी आणि शैक्षणिक यंत्रणेमध्ये आपली छाप निर्माण करण्यासाठी. त्यांचे बोधवाक्य ‘ज्ञान चारित्र्यासह शोभून दिसते’ काळाची गरज आहे, कारण चारित्र्य निर्मितीसह राष्ट्रनिर्मितीला चालना मिळते.”
शाळा फक्त इमारती नाहीत. त्या ज्ञान, चारित्र्य आणि भावी प्रमुखांच्या प्रतीक
इंडिया पोस्टच्या उत्तरेकडील एसएसपी (पोस्ट ऑफिसच्या वरिष्ठ अधीक्षक) डॉ. दीपशीखा बिर्ला या संस्मरणीय प्रसंगाचे महत्त्व सांगत म्हणाल्या, ”शाळा फक्त इमारती नाहीत. त्या ज्ञान, चारित्र्य आणि भावी प्रमुखांच्या प्रतीक आहेत. शाळा तरूण विचारवंतांना आकार देतात, त्यांच्यामध्ये मूल्ये व ज्ञान बिंबवतात, ज्यामुळे त्यांच्या जीवनशैलीला आकार मिळतो. हे स्पेशल कव्हर पोस्टल आर्टिफॅक्टपेक्षा अधिक आहे. भारतीय टपालखात्यासाठी ते समाज आणि व्यापक समुदायामधील प्रेमळ संबंधाचे प्रतीक आहे.”
गुजरात रिसर्च सोसायटीचे अध्यक्ष या संस्मरणीय प्रसंगी म्हणाले, ”आमच्यासाठी हा सन्माननीय क्षण आहे. आम्ही आमच्या अस्तित्त्वामध्ये संपादित केलेल्या यशासाठी कृतज्ञ आहोत. ४५ वर्षांमध्ये आमचा पारंपारिक मूल्यांचे निरीक्षण करणे व विद्यार्थ्यांमध्ये बिंबवणे आणि सर्जनशीलता व समकालीन विचारसरणीला प्रेरित करणे या दोन मूल्यांवर नेहमी विश्वास आहे.”
जेएमल स्कूल व ब्लूमिंगडेल्स प्री-प्रायमरीच्या मुख्याध्यापिका दमयंती भट्टाचार्य कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाल्या, “ब्लूमिंगडेल प्री-प्रायमरीच्या ४५व्या तसेच जेएमएल स्कूलच्या ४४व्या वर्धापनदिनानिमित्त भारतीय टपाल खात्याने दिलेल्या या सन्मानामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. या स्पेशल कव्हरच्या माध्यमातून आम्ही भूतकाळात प्राप्त केलेल्या यशांची दखल तर घेतली गेलीच आहे पण विद्यार्थ्यांना जबाबदार जागतिक नागरिक म्हणून घडण्यासाठी सज्ज करणारे सर्वांगीण शिक्षण देण्याचे उद्दिष्ट असेच पुढे नेत राहण्याची प्रेरणाही आम्हाला यामुळे मिळाली आहे. या प्रवासाचा भाग असलेल्या प्रत्येकाप्रती मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते.”
जेएमएल स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्पेशल कव्हर प्रकाशन समारंभाला आजी-माजी विद्यार्थी आणि अनेक पाहुणे उपस्थित होते.
जेएमएल स्कूल विषयी
जसूबेन एमएल स्कूल (जेएमएल) ही मुंबईतील खारमधील आघाडीची आयसीएसई शाळा आहे. विद्यार्थ्यांमध्ये शोधाचे चैतन्य चेतवण्याच्या व जोपासण्याच्या उद्दिष्टाने काम करणारी ही शाळा एनईपी-२०२० अंमलात आणणाऱ्या पहिल्या काही शाळांमधील एक आहे. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये पारंपरिक तरीही सुसंबद्ध मूल्यप्रणाली बिंबवण्याचे व आधुनिक विचारांनाही प्रोत्साहन देण्याचे लक्ष्य शाळेपुढे आहे. ही शाळा म्हणजे विश्वास, परस्पर आदर व अनुकंपा यांवर आधारित समुदाय आहे. विद्यार्थी शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शाळा सोडून जातील तेव्हा सेवेप्रती व पर्यावरणाचे रक्षण करण्याप्रती बांधिलकी त्यांच्यात विकसित झालेली असावी आणि स्वत:ला ओळखण्याची तसेच जागतिक समाजातील स्वत:च्या जबाबदाऱ्या समजून घेण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण झालेली असावी या उद्देशाने शाळा काम करते.