डहाणू: सध्या कोरोनाचा(Corona) वाढता प्रादुर्भाव पाहता कडक निर्बंध लावल्याने अनेक शहरे गावे सामसूम आहेत. सर्व नागरिक कोरोना संसर्ग वाढण्याचा भीतीने आपापल्या घरात बसले आहेत. त्यामुळे रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना(Street Dogs) खाण्यापिण्यासाठी काही मिळत नाही. त्यांच्यावर उपासमारीचे संकट कोसळले आहे. हॉटेल, मटण, चिकन, दुकानदार आपल्याकडील उरलेले अन्न, मांस, मटणाचे अवशेष उकिरड्यावर टाकत असतात. त्यावर कासा परिसरातील मोकाट कुत्री जगतात. या बाजारपेठ परिसरात जवळपास १५ ते २०कुत्रे पोटासाठी भटकंती करतात.
[blockquote content=”आम्ही वन्यजीव संरक्षण करण्यासाठी काम करतो.यासाठी वन विभाग सहकार्य करीत असते. पण पाळीव प्राणी यांच्या संरक्षणासाठी काही नागरिक, संस्था काम करीत आहेत. त्यांना या बाबतीत माहिती देतो. ते या भटक्या कुत्रांच्या खाण्याची व्यवस्था करतील.ग्रामस्थांनी देखील घरी उरलेले अन्न पदार्थ त्यांना द्यावेत. ” pic=”” name=”- धवल कंसारा, मानद वन्यजीव संघटना, पालघर जिल्हा अध्यक्ष”]
अनेक दिवसांपासून हॉटेल, मटण, चिकन, मासे दुकाने बंद आहेत. त्यामुळे यावर अवलंबून असणाऱ्या मोकाट कुत्र्यांना खाण्यासाठी काही मिळत नाही. त्यात नागरिकसुद्धा कोरोनाच्या भीतीने जास्त प्रमाणात बाहेर पडत नसल्याने या कुत्र्यांची मोठी आबाळ होत आहे. सर्व आपापल्या घरात बसून असल्याने बाहेर कुत्र्यांना अन्न, पाण्याची कमतरता भासत आहे. त्यामुळे हे कुत्रे रस्त्यावर बसून भुकेने व्याकुळ फिरत आहेत. रस्त्यावर मोजकेच नागरिक फिरत असल्याने ही कुत्री एकत्र जमून दहशत निर्माण करून हल्ले करीत आहेत. यामुळे भीषण शांततेत रस्त्यावरून जायला नागरिक घाबरत आहेत. एखाद्या मोटारसायकलस्वार यामुळे अपघात ग्रस्त होऊ शकतो. लहान मुलांनी तर बाहेर पडूच नये.
[read_also content=”हवामान खात्याने दिला चक्रीवादळाचा इशारा, किनारपट्टीच्या भागात हाय अलर्ट जारी https://www.navarashtra.com/latest-news/hurricane-warning-by-weather-department-beach-area-on-high-alert-nrsr-127339.html”]
[blockquote content=”या भटक्या कुत्र्यांमुळे सकाळी या रस्त्यावरून जाण्याची भीती वाटते. अनेक वेळा अंगावर येतात.कोरोनामुळे असलेली दुकांनावरील बंदी संपेपर्यंत या कुत्र्यांना अन्नाची कमतरता भासेल.यामुळे सर्वांनी काळजी घेतली पाहिजे.” pic=”” name=”- उदय सबनीस – पेपर विक्रते, कासा”]
या मुक्या प्राण्यांकडे कोणी लक्ष देत नाही. एखाद्या वेळेस अन्न न मिळाल्याच्या रागाने नागरिकांवर हल्ला करू शकतील. त्यामुळे ग्रामपंचायतीतर्फे या भटक्या कुत्र्यांवर काहीतरी उपाय योजना करायला पाहिजे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.याबाबतीत ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मोहन पाचलकर यांच्याशी बोललो असता त्यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना येथे लक्ष देण्यास सांगितले आहे. या कुत्र्यांच्या खाण्या पिण्याची व्यवस्था करण्यास सांगितलं आहे. काही दिवस दुकान बाजारपेठ बंद आहेत तिथपर्यंत लक्ष दिले जाईल.