नागपूर (Nagpur). यशोधरा नगरमधील पाठराबे वाडी (Wadi in Yashodhara Nagar) येथे १८ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या (suicide by hanging herself) केली. ही घटना शनिवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. निताली गंगाधर निखार (Nitali Gangadhar Nikhar) असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. ती बी. कॉम. प्रथम वर्षाला शिकत होती. ती हॅण्डलूमच्या कारखान्यात काम करायची.
[read_also content=”तस्करांवर पोलिसांचा रट्टा/ चंद्रपुरात पाच दारूतस्करांना अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त; अवैध दारूविक्रेत्यांमध्ये दहशतीचे वातावरण https://www.navarashtra.com/latest-news/five-drug-smugglers-arrested-in-chandrapur-16-lakh-confiscated-tens-of-thousands-of-illegal-drug-dealers-nrat-132969.html”]
एका अपरिचित कारणाने तिने आत्महत्या केली. या कारणावरून तिचा नातेवाइकांसोबत वादही झाला होता. यातूनच तिने टोकाचा निर्णय घेतला. नितालीने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीही पोलिसांनी जप्त केली. यातील मजकूर अत्यंत संवेदनशील असल्याने तो सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. यशोधरानगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.