नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी अचानक निधन झाले. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. यादरम्यान भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी वॉर्नला क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज मानण्यास नकार दिला होता. यानंतर गावस्कर यांच्यावर सातत्याने टीका होत होती. आता त्यांनी आपल्या वक्तव्यावर माफी मागितली आहे.
गावसकर म्हणाले होते, “सुनील गावस्कर इंडिया टुडेशी बोलताना म्हणाले की, माझ्यासाठी भारतीय फिरकीपटू आणि मुथय्या मुरलीधरन हे वॉर्नपेक्षा चांगले आहेत. भारतासाठी शेनचा विक्रम अतिशय मध्यम आहे. वॉर्नने नागपुरात फक्त एकदाच पाच विकेट घेतल्या. त्याशिवाय भारताविरुद्ध त्याला कोणतेही मोठे यश मिळाले नाही. मुरलीधरनला भारताविरुद्ध भरपूर यश मिळाले, त्यामुळे तो वॉर्नपेक्षा सरस होता.”