फोटो सौजन्य - सोशल मिडिया
India W vs Pakistan W Toss Update : महिला विश्वचषकाचा सहावा सामना आज भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे, भारताच्या संघाने पहिल्या सामन्यात श्रीलंकेच्या संघाविरुद्ध सामना झाला या सामन्यात भारताच्या संघाने पहिल्या सामन्यात पराभुत करुन विजय नावावर केला आहे. पाकिस्तानच्या संघाला पहिल्या सामन्यात बांग्लादेशविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. सामन्याला सुरुवात झाली आहे, या सामन्यात नाणेफेकीचा निर्णय आणि प्लेइंग 11 समोर आली आहे.
महिला विश्वचषकाचा सहावा सामना खेळवला जात आहे, या सामन्यात भारताची कर्णधार फातिमा सनाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या संघ पाकिस्तानपेक्षा मजबुत आहे. पाकिस्तानची पहिली सामन्यात फारच खराब कामगिरी राहिली होती. तर श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये भारताचे पहिले 6 विकेट्स गमावल्यानंतर भारताच्या फलंदाजांनी दमदार कमबॅक केला होता. या सामन्यात भारताची उपकर्णधार स्मृती मानधनावर क्रिकेट चाहत्यांची नजर असणार आहे.
World Cup 2025. PAK won the toss and elected to Bowl. https://t.co/9BNvQl3J59 #INDvPAK #CWC25 #TeamIndia — BCCI Women (@BCCIWomen) October 5, 2025
भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली कमालीची कामगिरी अमनजोत कौर हिने केली होती पण ती या सामन्यामध्ये तिची तब्येत ठिक नसल्यामुळे ती पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यामध्ये खेळणार नाही. तिच्या जागेवर भारताची वेगवान गोलंदाज रेणुका ठाकुर संघामध्ये खेळताना दिसणार आहे. हरमनप्रीत कौरने इंग्लडविरुद्ध मालिकेमध्ये शतक ठोकले होते तिच्याकडून मोठी खेळीची अपेक्षा भारतीय संघाला आहे.
मागील काही सामन्यांमध्ये भारताची अष्टपैलू दिप्ती शर्मा हिने कमालीचा फार्म दाखवला आहे मागील सामन्यामध्ये देखील तिने अर्धशतक झळकावले होते. या सामन्यामध्ये तिच्या कामगिरीवर चाहत्यांचे विशेष लक्ष असणार आहे.
प्रतिका रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा स्नेह राणा, क्रांती गौड, श्री चरणी, रेणुका ठाकुर
फातिमा सना (कर्णधार), मुनीबा अली सिद्दीकी (उपकर्णधार), आलिया रियाझ, डायना बेग, नशरा सुंधू, नतालिया परवेझ, सदफ शमास, सादिया इक्बाल, सिद्रा अमीन, सिद्रा नवाज, रमीन शमीम.