Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नियोजन समितीचा निधी वाया जाणार नाही याची दक्षता घ्या; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात 148 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक पोटनिवडणूक कार्यक्रम, तर महाळुंग, वैराग, नातेपुते, माढा, माळशिरस या नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे.

  • By Navarashtra News Network
Updated On: Nov 25, 2021 | 04:19 PM
नियोजन समितीचा निधी वाया जाणार नाही याची दक्षता घ्या; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात 148 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक पोटनिवडणूक कार्यक्रम, तर महाळुंग, वैराग, नातेपुते, माढा, माळशिरस या नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. तसेच संभाव्य स्थानिक इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 अंतर्गत जिल्हा नियोजन समितीकडून विविध शासकीय विभागांना मंजूर करण्यात आलेला निधी त्याच कामावर व वेळेत खर्च होणे अपेक्षित आहे. हा निधी कोणत्याही कारणास्तव वाया जाणार नाही याची दक्षता सर्व संबंधित विभागप्रमुखांनी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Milind Shambharkar) यांनी दिले.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित शासकीय विभागप्रमुखाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, विभागीय वन अधिकारी धैर्यशील पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, मुख्य वित्त व लेखाधिकारी अजय सिंह पवार यांच्यासह अन्य संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शंभरकर पुढे म्हणाले की, जिल्‍हा वार्षिक योजना सन 2021-22 अंतर्गत मंजूर असलेल्या निधीतून प्रस्तावित केलेल्या कामांना प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव सादर करताना संबंधित विभागांनी निवडणूक जाहीर झालेली 148 गावे व नगरपंचायती वगळून विकासकामांचे प्रस्ताव सादर करावेत. अशा प्रस्तावांना तात्काळ प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. तसेच संभाव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन सर्व विभाग प्रमुखांनी त्यांना मंजूर करण्यात आलेल्या निधीतून वेळेत कामे पूर्ण करून घ्यावी. मंजूर असलेला निधी व्यपगत होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सूचित केले.

यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव प्राप्त न झालेल्या विभागांचा सविस्तर आढावा घेऊन तात्काळ प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश दिले. तसेच माहे मार्च 2022 अखेर मंजूर निधी खर्च झाला नाही तर संबंधित विभाग प्रमुख यांना जबाबदार धरण्यात येईल, असेही त्यांनी सूचित केले.

प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे यांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 अंतर्गत प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर न केलेल्या विभागाची माहिती दिली. तसेच जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 साठी सर्व विभागांनी तात्काळ आराखडे सादर करण्याची सूचना केली.

Web Title: Take care that the funds of the planning committee are not wasted instructions of collector shambharkar nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2021 | 04:19 PM

Topics:  

  • Milind Shambharkar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.