• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Thackeray Govt Should Downplay Centre Success On Vaccination Nrka

लसीकरणाबाबत ठाकरे सरकारने केंद्राच्या यशाचा कित्ता गिरवावा : रणजितसिंह नाईक-निंबाळकर

  • By Navarashtra News Network
Updated On: Sep 01, 2021 | 08:39 PM
लसीकरणाबाबत ठाकरे सरकारने केंद्राच्या यशाचा कित्ता गिरवावा : रणजितसिंह नाईक-निंबाळकर
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सातारा : जगभरातील निवडक प्रसिद्धी माध्यमांच्या अपप्रचारास चोख प्रत्युत्तर देत देशातील तब्बल ६५ कोटी १५ लाख लोकसंख्येच्या लसीकरणाचा विक्रमी टप्पा गाठणाऱ्या मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी लसीकरणात महाराष्ट्र मात्र अजूनही रेंगाळलेलाच असून लसीकरणाबाबतच्या धोरण लकव्यामुळे लस मिळविण्याकरिता राज्यातील जनतेची केविलवाणी धडपड सुरू आहे. संपूर्ण देशाच्या तुलनेत आठव्या क्रमांकावर असूनही लसीकरणाबाबत स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या ठाकरे सरकारने लसीकरणाचा निश्चित कालबद्ध कार्यक्रम आखून कोरोना रोखण्याच्या केंद्राच्या यशाचा कित्ता गिरवावा, अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी बुधवारी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

भारतासारख्या गरीब देशात ऑगस्टपूर्वी ६० कोटी लसीकरणाचा टप्पा गाठला जाणार नाही, असा अपप्रचार काही आंतरराष्ट्रीय वाहिन्यांवरून सुरू होता. मात्र, ३१ ऑगस्ट रोजी तब्बल ६५ कोटी १२ लाख लोकांचे लसीकरण पूर्ण करून मोदी सरकारने या अपप्रचारास चोख चपराक लगावली आहे. याच वेगाने राज्यांनीदेखील लसीकरण करावे व निश्चित धोरण आखून राज्यातील सर्व नागरिकांना वेळेवर लस उपलब्ध करून द्यावी याकरिता लशीच्या मात्रांचे नियोजनबद्ध वाटपही केंद्र सरकारने केले असून महाराष्ट्रास गरजेहून अधिक मात्रा उपलब्ध झाल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रास ८६ लाख ७४ हजार लस मात्रा वितरित करण्यात येणार होत्या, त्याऐवजी प्रत्यक्षात ९१.८१ लाख म्हणजे पाच लाखांहून अधिक मात्रा पुरविण्यात आल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. असे असतानाही, राज्याच्या अनेक लसीकरण केंद्रांवरून आजही नागरिकांना हात हलवत परतावे लागत आहे, तर अनेक केंद्रांवर लस नसल्याचे कारण देत ऐनवेळी लसीकरण थांबविले जात आहे. ठाकरे सरकारकडे लसीकरणाचा नेमका कार्यक्रम नाही आणि मोफत व सशुल्क लसीकरण वाटपाचे धोरणही नाही त्यामुळे जनतेचे हाल सुरूच आहेत, असा आरोप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या पत्रकाद्वारे केला आहे.

केवळ कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती दाखवून जनतेस घराबाहेर पडण्यापासून रोखणे एवढा एककलमी कार्यक्रम ठाकरे सरकार राबवत असल्याने महाराष्ट्र पुन्हा बेरोजगारी, मंदी आणि नैराश्याच्या सावटात ढकलला जात आहे. त्यातच, मोफत लसीकरण केंद्रांवर लस नाही आणि खाजगी केंद्रावर सशुल्क लसीकरण मात्र उपलब्ध असल्याने लसीकरणाच्या मोहिमेविषयी संशय व्यक्त होत असून सामान्य नागरिकांना मोफत लस उपलब्ध करून देण्यात राज्य सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही नाईक निंबाळकर यांनी केला.

कोरोनासंबंधात केंद्र सरकारच्या सूचनांचा पाढा वाचत स्वतःचा केविलवाणा बचाव करण्याकरिता राज्याचे दैनंदिन जनजीवन थांबवून लसीकरण मोहिमेतील सरकारी ढिसाळपणावर पांघरूण घालण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न आहे. लसीकरणाचे धोरणच नसल्यामुळेच महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांत कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत असून कोरोना रोखण्याच्या राष्ट्रीय मोहिमेस पुन्हा महाराष्ट्रातून खीळ बसले, अशी भीती त्यांनी या पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे. देशात महत्वाकांक्षी लसीकरणाचा विक्रमी टप्पा पूर्ण करून जगासमोर आदर्श उभा केल्याबद्दल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या पत्रकाद्वारे पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले आहे.

Web Title: Thackeray govt should downplay centre success on vaccination nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2021 | 08:39 PM

Topics:  

  • केंद्र सरकार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!

Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!

Dec 29, 2025 | 06:43 PM
Maharashtra Politics: सांगलीत भाजपची विकेट पडणार? संभाजी भिडेंचे धारकरी थेट निवडणुकीच्या रिंगणात

Maharashtra Politics: सांगलीत भाजपची विकेट पडणार? संभाजी भिडेंचे धारकरी थेट निवडणुकीच्या रिंगणात

Dec 29, 2025 | 06:41 PM
Mumbai : विकासाच्या मुद्द्यांवरच निवडणूक हवी, काँग्रेस-वंचित आघाडीवर वर्षा गायकवाडांचं वक्तव्य

Mumbai : विकासाच्या मुद्द्यांवरच निवडणूक हवी, काँग्रेस-वंचित आघाडीवर वर्षा गायकवाडांचं वक्तव्य

Dec 29, 2025 | 06:36 PM
Amit Shah on Congress: काँग्रेसने घुसखोरांना देशात वसवले, आम्ही ईशान्येत….; अमित शाह यांचा आसाममधून घणाघात

Amit Shah on Congress: काँग्रेसने घुसखोरांना देशात वसवले, आम्ही ईशान्येत….; अमित शाह यांचा आसाममधून घणाघात

Dec 29, 2025 | 06:33 PM
EV Cars : 5 वर्ष चालवल्यानंतर ‘ही’ कार कंपनीला परत करू शकता, ६०% रक्कम मिळवू शकते, कसं ते जाणून घ्या

EV Cars : 5 वर्ष चालवल्यानंतर ‘ही’ कार कंपनीला परत करू शकता, ६०% रक्कम मिळवू शकते, कसं ते जाणून घ्या

Dec 29, 2025 | 06:29 PM
कोल्हापूर महापालिकेसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; कोणाला मिळाली संधी?

कोल्हापूर महापालिकेसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; कोणाला मिळाली संधी?

Dec 29, 2025 | 06:26 PM
राजकीय मैदानात मराठी अभिनेत्री; लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट

राजकीय मैदानात मराठी अभिनेत्री; लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट

Dec 29, 2025 | 06:24 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : निवडणूक आयोगाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

Ahilyanagar : निवडणूक आयोगाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

Dec 29, 2025 | 06:23 PM
Ahilyanagar : निवडणूक आयोगाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

Ahilyanagar : निवडणूक आयोगाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

Dec 29, 2025 | 06:15 PM
Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!

Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!

Dec 29, 2025 | 03:10 PM
Bhayandar :  भाईंदरमध्ये किरकोळ कारणावरून अमानुष मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Bhayandar : भाईंदरमध्ये किरकोळ कारणावरून अमानुष मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Dec 29, 2025 | 03:05 PM
Sangli News : भाजप वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करूनही डावलले जात असल्याचा मुद्दा

Sangli News : भाजप वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करूनही डावलले जात असल्याचा मुद्दा

Dec 28, 2025 | 07:57 PM
Mira Bhayandar : मराठी भाषेवरून मारहाण? जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा थेट इशारा

Mira Bhayandar : मराठी भाषेवरून मारहाण? जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा थेट इशारा

Dec 28, 2025 | 07:47 PM
Pimpri – Chinchwad Election : आपकी बार 125 पार, आमदार शंकर जगतापांचा विश्वास

Pimpri – Chinchwad Election : आपकी बार 125 पार, आमदार शंकर जगतापांचा विश्वास

Dec 28, 2025 | 07:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.