Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टीम इंडियाच्या खराब फॉर्मला बीसीसीआय जबाबदार, एका वर्षात १२० आयपीएल मॅचेस आणि ७६ दिवस इंटरनॅशनल क्रिकेट खेळली टीम

अति क्रिकेटसोबत बायो बबल आणि क्वारंटाईनलाही प्लेअर्सना सामोरे जावे लागले. या काळात त्यांना हॉटेल आणि ग्राऊंड सोडल्यास कुठेही जाण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे त्यांना मानसिक थकवा आला नसेल, तरच नवल. बीसीसीआयने टीम इंडियातील प्लेअर्सची स्थिती सर्कसच्या पिंजऱ्यातील प्राण्यांसारखी केली होती. याचा परिणाम टीम इंडियाच्या शारिरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर झाला, त्याचा परिणाम आता टी-२० वर्ल्ड कप मॅचेसमध्ये पाहायला मिळतो आहे.

  • By Navarashtra News Network
Updated On: Nov 02, 2021 | 02:31 PM
टीम इंडियाच्या खराब फॉर्मला बीसीसीआय जबाबदार, एका वर्षात १२० आयपीएल मॅचेस आणि ७६ दिवस इंटरनॅशनल क्रिकेट खेळली टीम
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली-  टी-२० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या पदरी फक्त अपयश पडलं आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड टीमकडून पराभव स्वीकारल्यानंतर आता सेमी फायनलमध्ये पोहचण्याची संधी धूसर झाली आहे. अशा स्थितीत क्रिकेट पॅन्स क्रिकेटर्सना ट्रोल करतायेत. पम या परिस्थितीला जबाबदार कोण टीम इंडिया की बीसीसीआय, हा प्रश्न आहे. खरंतर टीम इंडियाचे शेड्यूल पाहिले तर या सगळ्याला बीसीसीआयलाच जबाबदार धरावं लागेल, अशी परिस्थिती आहे. गेल्या काही दिवसांत टीम इंडियाचे शेड्यूलच असे होते, की टी-२० वर्ल्ड कप टुर्नामेंट सुरु होण्यापूर्वी टीममधील सर्वच मेंबर्स बऱ्यापैकी थकलेलेच होते.

१.  १३ महिन्यात २ आयपेल सिझन आणि सततच्या इंटरनॅशनल मॅचेस

गेल्या वर्षी कोरोनामुळे मार्च ते सप्टेंबर या काळात टीम इंडियाची एकही सीरिज झाली नाही. आयपेलही कॅन्सल झाले. त्यामुळे नुकसान भरपाईसाठी बीसीसीआयने सप्टेंबरपासून क्रिकेट सीरिजचा धडाकाच लावला, तो अद्यापपर्यंत संपलेला नाही. सप्टेंबर २०२० पासून टीम इंडिया सातत्याने मैदानात आहे. दुबईत सप्टेंबर २०२०मध्ये आयपीएल सिझन झाला, त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौरा, त्यानंतर इंग्लंड संघासोबत भारतात मॅचेस झाल्या. ते सपंल्यावर लगेच आयपीएल २०२१ च्या पहिल्या मॅचेस झाल्या. वाढत्या कोरोनामुळे आयपीएल स्थगित करण्यात आले. त्यानंतर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिपची फआयनल खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये गेली. त्यानंतर इंग्लंडमध्येच पाच टेस्टची सिरीज झाली. याच काळातच टीम इंडियाची टीम बी श्रीलंकेला रवाना झाली.

इंग्लंडची पाचवी टेस्ट कोरोनामुळे रद्द झाली, तर लगेचच टीम इंडिया आयपीएलच्या स्थगितीनंतरच्या मॅचेस खेळण्यासाठी दुबईत दाखल झाली. प्रतिस्पर्धी आणि फ्रेंचाईसच्या दबावात आयपीएल पार पडल्यावर दोनच दिवसात टीम इंडिया वर्ल्ड कप टी-२०च्या रणांगणात उतरली.

एकावेळी हे सगळं वाचणंही थकवणार आहे, त्यामुळे प्रत्यक्ष टीममधील प्लेअर्सचं काय झालं असेल, याचा विचारच केलेला बरा. थोडक्यात गेल्य १३ महिन्यात टीमने आयपेलचे दोन सिझन आणि ७६ आंतरराष्ट्रीय मॅचेस खेळल्या आहेत, त्याचबरोबर काही प्लेअर्स देशांतर्गत क्रिकेट मॅचेसही खेळले आहेत.

२. आयपीएलच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत सहा क्रिकेटर्स मैदानात

आयपीएलच्या शेवटच्या राऊंडी सुरुवात १० ऑक्टोबरला झाली. यात विराट कोहली, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, ऋषभ पंत, वरुण चक्रवर्ती आणि आर अश्विन सामील होते. ८ ऑक्टोबरला मुंबई इंडियन्सची शेवटची मॅच झाली, त्यात रोहित शर्मा, जसप्रित बुमराह यासह सहा प्लेअर्स होते. म्हणजेच आठवडाभरावर वर्ल्ड कप असताना पूर्ण म आयपीएल खेळत होती.

३. मानसिक थकवा आला

अति क्रिकेटसोबत बायो बबल आणि क्वारंटाईनलाही प्लेअर्सना सामोरे जावे लागले. या काळात त्यांना हॉटेल आणि ग्राऊंड सोडल्यास कुठेही जाण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे त्यांना मानसिक थकवा आला नसेल, तरच नवल. बीसीसीआयने टीम इंडियातील प्लेअर्सची स्थिती सर्कसच्या पिंजऱ्यातील प्राण्यांसारखी केली होती. याचा परिणाम टीम इंडियाच्या शारिरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर झाला, त्याचा परिणाम आता टी-२० वर्ल्ड कप मॅचेसमध्ये पाहायला मिळतो आहे.

४. ३ आठवड्यांच्या ब्रेकची गरज होती

आयपीएल हा क्रिडा प्रकार शारिरिक आणि मानसिक स्वास्थ्याची कसोटी पाहतो. त्यातच सातत्याने क्रिकेट खेळल्याने प्लेअर्स थकून गेले होते. आयपीएल -२ नंतर टीम इंडियाला तीन आठवड्यांच्या ब्रेकची गरज होती. ती न मिळाल्याने क्रिकेटर्स पूर्णपणे खचले.

५. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि पाकिस्तान टीम मोजकंच खेळली

बीसीसीआय व्यतिरिक्त इतर क्रिकेट बोर्डाने संयमाने काम केले. गेल्या वर्षी कोरानामुळे मॅचेस झाल्या नाहीत, त्यानंतर इतर बोर्डांनी कमी क्रिकेट खेळण्याला पसंती दिली. इंग्लंडने पाकिस्तान दौरा रद्द करताना, सुरक्षेच्या कारणासह क्रिकेटर्सच्या मानसिक स्वास्थ्याचेही कारण दिले होते. ऑस्ट्रेलियाने द. अफ्रिकेसोबत होणारी सीरिज रद्द केली.

६. इतर देश वर्ल्डकपवर लक्ष ठेवून होते आणि आपली टीम आयपीएल खेळत होती

यावर्षी वर्ल्ड कप होणार हे सर्वांना माहित होते. त्यामुळे इतर बोर्डांनी या वर्षी शेवटचा काळ त्यासाठी राखून ठेवला होता. टी-२० वर्ल्ड कपवर त्यांचं लक्ष होतं. बीसीसीआय मात्र आयपीएल यशस्वीपणे पार पाडण्यात गुंतली होती.

७. बीसीसीआयसाठी पैसाच महत्त्वाचा, क्रिकेटर्स झाले घाण्याचे बैल

मेमध्ये कोरानामुळे आय़पीएल २०२१ स्थगित करण्याचा निर्णय झाला, तचेव्हा बीसीसीआयचे २ हजार कोटींचे नुकसान होणार, अशी चर्चा रंगली होती. त्याची भरपाई करण्यासाठी सप्टेंबरमध्ये आयपीएल फेज २ दुबईत खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर आपल्याला टी-२० वर्ल्ड कपचे मिळालेले यजमानपदही ओमान आणि दुबईला देण्यात आले. कोणतेही आर्थिक नुकसान होऊ नये, या नादात बीसीसीआयने टीम इंडियाच्या क्रिकेटर्सना घाण्याच्या बैलासारखे जुंपले आणि त्यांच्याकडून अतिक्रिकेट खेळवून घेतले. त्यामुळेच आजच्या टीम इंडियाच्या स्थितीला बीसीसीआय जबाबदार असल्याचे मानण्यात येत आहे.

Web Title: The bcci is responsible for indias poor form having played 120 ipl matches in a year and 76 days of international cricket nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2021 | 02:27 PM

Topics:  

  • bcci
  • international cricket
  • IPL matches

संबंधित बातम्या

Dream11, Pokerbaazi, Zupee आणि MPL बंद, आता युजर्सचे पैसे कोण परत करणार?
1

Dream11, Pokerbaazi, Zupee आणि MPL बंद, आता युजर्सचे पैसे कोण परत करणार?

BCCI मध्ये निघाल्या नवीन जागा! ‘या’ नोकरीसाठी मिळणार वार्षिक तब्बल ९० लाख रुपये
2

BCCI मध्ये निघाल्या नवीन जागा! ‘या’ नोकरीसाठी मिळणार वार्षिक तब्बल ९० लाख रुपये

क्रीडा मंत्रालयाकडून नवीन नियमावली! रॉजर बिन्नी यांचा BCCI अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला; घ्याव्या लागणार निवडणुका
3

क्रीडा मंत्रालयाकडून नवीन नियमावली! रॉजर बिन्नी यांचा BCCI अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला; घ्याव्या लागणार निवडणुका

टीम इंडियाच्या निवड समितीत होणार मोठा बदल! माजी क्रिकेटपटूचे नाव आलं पुढे, BCCI घेणार निर्णय?
4

टीम इंडियाच्या निवड समितीत होणार मोठा बदल! माजी क्रिकेटपटूचे नाव आलं पुढे, BCCI घेणार निर्णय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.