नागपूर (Nagpur). आपल्या आयुष्यातील आनंदाचा क्षण साजरा करताना (While celebrating the happiest moment of his life) कुटुंबावरच दु:खाचा डोंगर कोसळला (a mountain of sorrow fell on the family). आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी वडील, मुलगा आणि मुलाची आई (The father, son and mother) तलावा शेजारी (the lake) गेली होती. यावेळी वडील आणि 12 वर्षांचा मुलगा तलावात उतरले. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. त्यांना वाचविण्यात अपयश आल्याने दोघांना पाण्यात बुडून मृत्यू झाला. (Failing to rescue them, the two drowned)
नागपुरातल्या टिपू सुल्तान चौकात राहणाऱ्या शेख दाम्प्त्यांचा लहान मुलाचा आज वाढदिवस होता. त्यानिमित्तान आई- वडील आणि दोन्ही लहान मुले झिल्पी तलावावर गेलेत. यावेळी वाढदिवस साजरा करण्यास गेलेल्या बाप -लेकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
[read_also content=”१० झोनमध्ये कोरोनाच्या ६ हजार सुपर स्पे्रडर्सची तपासणी https://www.navarashtra.com/latest-news/great-measures-to-prevent-corona-of-nagpur-municipal-corporation-inspection-of-6000-corona-super-spreaders-in-10-zones-nrat-130188.html”]
वडील अब्दुल शेख (35 ) आणि मोठा मुलगा शबील शेख (12) पाण्यात उतरले. तर आई ही पाण्यात उतरण्याच्या तयारीत असताना वडील आणि मुलगा दोघे बुडू लागले. मुलाच्या आईने आरडा ओरडा करत पाण्यात धाव घेत त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र दोघांना वाचवण्यात यश आले नाही. वडील आणि मुलाचा बुडून मृत्यू झाला होता. हिंगणा पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे. दरम्यान, या मुलाच्या आईला हिंगणा येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे.