सौजन्य फोटो - सोशल मिडीया
नागपूरमधील बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेवतीनगर परिसरात ही दुर्घटनेची घटना घडली. मनीष प्रल्हाद गणवीर आणि सोनाली मनीष गणवीर असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. दोघेही गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागड येथील शाळेत शिक्षक म्हणून सेवा बजावत होते. दिवाळीची सुट्टी असल्यामुळे हे दांपत्य मागच्या आठवड्यात नागपूर येथील आपल्या घरी आले होते. मात्र, कोणाच्याही कल्पनेत नसताना त्यांनी हे टोкаचे पाऊल उचलले.
मिळालेल्या माहितीनुसार, मनीष आणि सोनाली यांचा हा दुसरा विवाह होता. दोघांचे यापूर्वी घटस्फोट झाले होते, त्यानंतर त्यांनी ऑगस्ट महिन्यात कोर्ट मॅरेज करून नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. मात्र, त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरला आणि काही दिवसांतच त्यांच्यात खटके उडू लागले. मयत मनीष यांचे आई-वडील नातेवाइकांशी बौद्धगया येथे गेले होते, तरीही ते या दांपथीयांच्या सातत्याने संपर्कात होते. शनिवारी दुपारी दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर रात्री त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
दरम्यान, दोघांचाही फोन लागm नसल्यामुळे मनीष यांच्या आईने आपल्या भाच्याला घरी कुणी आहे का, हे पाहण्यासाठी पाठवले. भाचा घरी पोहोचला तेव्हा घराचा दरवाजा बंद होता. त्याने बरीच बेल वाजवली, परंतु आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संशय आल्याने तो टिनाच्या शेडवर चढून दुसऱ्या माळ्यावरील गॅलरीत गेला. तिथून खिडकीतून आत डोकावून पाहिले असता त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने तत्काळ याची माहिती शेजाऱ्यांना, नातेवाईकांना आणि पोलिसांना दिली. बेलतरोडी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरणाची नोंद केली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
Ans: नागपूरमधील बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेवतीनगर परिसरात ही घटना घडली.
Ans: नीष आणि सोनाली हे दोघेही गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागड येथील शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते.
Ans: फोन उचलत नसल्यामुळे आईने पाठवलेल्या भाच्याने गॅलरीच्या खिडकीतून पाहिले असता हा प्रकार समोर आला.






