फोटो सौजन्य- IIT Madras Magazine
2024 ची एनआयआरएफ ( नॅशनल इंस्टिट्यूशनल रॅंकिंग फ्रेमवर्क) रॅंकिंग केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद प्रधान यांनी आज सोमवारी ( दि. 12 ऑगस्ट 2024) जारी केली आहे. या एनआयआरएफ रॅंकिंगद्वारे देशातील उच्च शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्थांचे मुल्यांकन केले जाते आणि त्यांना क्रमाक दिला जातो. NIRF रॅंकिगचे हे 9 वे वर्ष आहे. या क्रमवारीनुसार आयआयटी मद्रास ही भारतातील सर्वेात्तम शैक्षणिक संस्था ठरली आहे. तर दुसऱ्या स्थानावर भारतीय विज्ञान संस्था (IIS) दुसऱ्या क्रमांकावर आहे. महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील आयआयटी बॉम्बे ही तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशातील पहिल्या 10 शैक्षणिक संस्थापैकी तब्बल 7 आयआयटी शिक्षण संस्था आहेत. त्यामुळे आयआयटीने या रॅंकिंगमध्ये बाजी मारली आहे. तसेच एनआयआरएफद्वारे शैक्षणिक संस्थांच्या प्रकारानुसारही वेगवगेळी क्रमवारी देण्यात येते.
या रॅंकिंगनुसार देशात सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये दिल्ली येथील अनेक महाविद्यालयांनी क्रमवारीमध्ये चांगले स्थान मिळविले आहे. महाराष्ट्रातील केवळ 1 शिक्षण संस्था पहिल्या 10 शैक्षणिक संस्थेमध्ये येते.