जगातील सर्वात महागडा चित्रपट! 3 कोटींच्या बजेटसह केली 8 कोटींची कमाई, तुम्ही पाहिलात की नाही?
तुम्ही आजवर अनेक बिग बजेट चित्रपटांविषयी ऐकले असेल मात्र आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महागड्या चित्रपटाविषयी सांगत आहोत. हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट म्हणून ओळखला जातो
या चित्रपटाने जगभर छप्परफ़ाड कमाई केली. कमाईच्या बाबतीत याचा विक्रम आजवर कोणी मोडू शकलं नाही. चित्रपटाची कथा, ॲक्शन आणि ग्राफिक्स इतके जबरदस्त होते की प्रेक्षकांच्या ते प्रचंड पसंतीस पडले
या चित्रपटाचे नाव आहे 'पायरेट्स ऑफ़ द कैरेबियन'. हा चित्रपट 2011 साली रिलीज झाला. हा एक काल्पनिक चित्रपट आहे ज्याची कथा समुद्री पायरेट जॅकच्या अवतीभोवती फिरते
रॉब मार्शल दिग्दर्शित या चित्रपटात हॉलिवूड स्टार जॉनी डेप समुद्री डाकू जॅक स्पॅरोच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट आजही लोकांना तितकाच आवडतो
माहितीनुसार, या चित्रपटाचे बजेट 3,321 कोटी रुपये होते. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 8,762 कोटी रुपयांची कमाई केली. आजही हिट चित्रपटांच्या यादीत याचे नाव आवर्जून घेतले जाते