Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ नऊ महिला आहेत राज्यातल्या प्रशासकीय सेवेतल्या शान; आठव्या क्रमांकाच्या अधिकाऱ्याचा झाला होता १४ व्या वर्षीच बाल विवाह

नवरात्र म्हणजे म्हणजे स्त्री शक्तीचा जागर. नवरात्रोत्सवाला आजपासून देशभरात प्रारंभ होत आहे. या निमित्याने महाराष्टरातल्या आपापल्या क्षेत्रात विशिष्ट योगदान देणाऱ्या महिलांची माहिती देण्याचा 'नवराष्ट्र'चा मानस आहे. जाणून घेऊया महाराष्ट्रातल्या महिला आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांबद्दल ज्यांनी महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेत मनाचा तुरा रोवला आहे.

  • By Nitish Gadge
Updated On: Oct 17, 2020 | 12:46 PM
ips officer

ips officer

Follow Us
Close
Follow Us:

नवरात्र म्हणजे म्हणजे स्त्री शक्तीचा जागर. नवरात्रोत्सवाला आजपासून देशभरात प्रारंभ होत आहे. या निमित्याने महाराष्ट्रातल्या आपापल्या क्षेत्रात विशिष्ट योगदान देणाऱ्या महिलांची माहिती देण्याचा ‘नवराष्ट्र’चा मानस आहे.
जाणून घेऊया महाराष्ट्रातल्या महिला आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांबद्दल ज्यांनी महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेत मनाचा तुरा रोवला आहे.

रश्मी शुक्ला  

रश्मी शुक्ला या १९८८ च्या आयपीएस बॅचच्या अधिकारी आहेत. मुंबई पोलिस दलात त्यांनी वेगवेगळया पदांवर कर्तव्य बजाविले आहे. एक शिस्तप्रिय महिला अधिकारी म्हणून त्यांची पोलिस दलामध्ये ओळख आहे. आयुक्त रश्मी शुक्ला यांचे भूगर्भशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण झाले आहे.

तेजस्वी सातपुते

तेजस्वी सातपुते या  महाराष्ट्र कॅडरचे २०१२ बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेगावमधील पाथर्डी हे त्यांचे गाव असुन त्यांनी बायो-टेक्नॉलॉजी आणि लॉ मध्ये आपले शिक्षण पुर्ण केले आहे. त्या एक संशोधक व्यक्ती आहेत. परंतु २०१२ मध्ये त्यांच्या स्पर्धात्मक परीक्षेत सामाजिक विषयातील उत्सुकतेमुळे लोकसेवा आयोग (यूपीएससी) परीक्षा दिली. त्यांनी या आधी महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) सोबत कार्य केले तसेच पुणे ग्रामीण पोलिसांबरोबर अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे.

आरती सिंग

आरती सिंह २००६ बॅचमधील आयपीएस अधिकारी आहेत. एमडी गायनाकलॉजिस्ट असणाऱ्या आरती सिंह यांनी काही काळ वैद्यकीय क्षेत्रात कर्तव्य बजावले. त्यावेळी मुलगी होण्याच्या कारणावरून महिलांना किती त्रास सहन करावा लागतो. आपण महिलांसाठी काही करायला पाहिजे, अशी जाणीव त्यांना झाली. त्यानंतर युपीएससीची परीक्षा देऊन त्या आयपीएस अधिकारी बनल्या.  

विनिता साहू

२०१० च्या तुकडीच्या आयपीएस असलेल्या विनिता साहू यांनी सिंधुदुर्गला अतिरिक्त अधीक्षक आणि नांदेड तसेच वाशीम येथे ‘पोलीस अधीक्षक म्हणून सेवा दिल्यानंतर त्यांची भंडारा येथे २०१५ मध्ये बदली झाली होती. विनिता साहू भंडारा येथे पोलीस अधीक्षक असताना २०१७ मध्ये त्यांनी मोबाईल पोलीस चौकीचा अनोखा उपक्रम राबवून राज्यच नव्हे तर देशपातळीवर सुरक्षा यंत्रणेचे लक्ष वेधले होते.

मोक्षदा पाटील 

मूळच्या जळगाव निवासी असलेल्या आयपीएस मोक्षदा पाटील यांचे वडील सिटी इंजिनिअर पदावर ठाणे महापालिकेत कार्यरत आहेत. आई-वडील आणि एक लहान बहिण असा आमचा परिवार, प्राथमिक, माध्यमिक शिक्षण ठाण्यातच झाले. लहानपणापासून आई-वडीलांनी करिअरसंदर्भात निर्णय घेण्याचे वैचारिक स्वातंत्र्य दिले. त्यानुसार भविष्याचा वेध घेत भारतीय सेवेत दाखल होण्याचा निश्चय केला. २०११ला  युपीएसीमध्ये निवड झाली.

शारदा राऊत

सन २००५च्या आयपीएस बॅचच्या अधिकारी शारदा राऊत यांची राज्यातील अनेक ठिकाणी महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती झालेली आहे. नागपूर (शहर), कोल्हापूर, मिरारोड येथे काम केलेल्या राऊत यांनी मुंबई पोलिस दलात पोलिस उपायुक्त (मुख्यालय-१) या पदावर कार्यरत होत्या.

दीपाली मासिरकर

दीपाली मासिरकर या २००८ बॅचच्या आयपीएस अधिकारी आहे. त्या अत्यंत कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखल्या जातात.

एन. अंबिका

आयपीएस अधिकारी एन. अंबिका यांचे जीवन हे अत्यंत प्रेरणादायी आहे. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांचा बालविवाह झाला होता. वयाच्या १८व्या वर्षी दोन मुलींची आई असलेल्या अंबिका यांनी  आयपीएस होण्याचे स्वप्न पहिले व ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करीत आयपीएस अधिकारी झाल्या.

ज्योतिप्रिया सिंग

ज्योतिप्रिया सिंग २००८ बॅचच्या आयपीएस अधिकारी आहे. लेडी सिंघम म्हणून त्यांना पोलीस खात्यात ओळखले जाते. अनेक कुख्यात गुन्हेगारांच्या त्यांनी मुसक्या आवळल्या आहे.

Web Title: These nine women in the administrative service of maharashtra are the pride of the state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2020 | 01:02 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.