उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांची अधिकृत यादी (Candidates List) जाहीर होण्यापूर्वीच पक्षाकडून एबी फॉर्म देऊन अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनाही भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. रवी राजा धारावीतील वॉर्ड क्रमांक 185 मधून निवडणूक लढवणार आहेत.
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ डॅडी यांनीही महानगरपालिकेच्या निवडणूकीत एन्ट्री केली आहे. सोबतच त्यांच्या दोन्ही मुली, गीता गवळी आणि योगिता गवळी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उमेदवार म्हणून उभ्या राहणार आहेत.