पुणे महानगरपालिकेत गेल्या निवडणुकीत ४१ प्रभाग होते. तेव्हा सदस्य संख्या १५२ होती. आता ५८ प्रभाग असून सदस्य संख्या १७३ इतकी आहे. गेल्या निवडणुकीत भाजप ९७ जागा जिंकून बहुमताने महापालिका सत्तेत आले. आरपीआयने त्यांना पाठिंबा दिला होता. त्यावेळी राष्ट्रवादीला भाजप पाठोपाठ जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादीचे ३९ नगरसेवक निवडून आले. यामुळे महापालिकेतील विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादीला मिळाले. शिवसेनेला या निवडणुकीत केवळ १० जागा, काँग्रेसला ९, आणि मनसेला २, एमआयएमला १ , व अन्य ४ असे १६२ नगरसेवक सभागृहात आले.






