ओटीटीवर नाट्यरसिकांना मिळणार नाट्यखजिना...
मनोरंजनाच्या नव्या माध्यमाने प्रेक्षकात छान सुळकांडी मारलेली आहे. म्हणून त्याचा नाटकावर फारसा परिणाम झालेला नाही. उलट रंगमंचावर येणाऱ्या नाटकाची संख्या लक्षात घेतली तर नाटकाला बरे दिवस आले आहेत. हे यातून सिद्ध होते अर्थात ही किमया यापूर्वी आलेल्या नव्या नाटकाची आहे हे नाकारता येणार नाही. अशी जुनी नाटके पुन्हा आपल्याला पाहायला मिळावीत या दृष्टीने फक्त नाट्यसंस्था पुढाकार घेत नाहीत तर अल्ट्रा झकास मराठी ओटीटीने सुद्धा हा जुन्या नाटकांचा खजिना उपलब्ध केलेला आहे. नाटकाची नावं पाहिल्यानंतर अरे हा तर नाट्य खजिना असेच शब्द बाहेर पडतात.
वाढदिवशी ‘या’ प्रसिद्ध रॅपरने गमावला आपला जीव, वयाच्या ३९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास !
नाटक समृद्ध, जिवंत कला जा आहे हे असे जरी आपण म्हणत असलो तरी मालिका, चित्रपट, ओटीटी या माध्यमाला छोट्या पडद्यावर जेवढे प्राधान्य दिले गेलेले तेवढ्या नाटकाचा विचार झालेला नाही. याचा अर्थ नाटकाकडे दुर्लक्ष झाले आहे असे म्हणता येणार नाही. नाटकाचा मोठा प्रेक्षक आहे म्हटल्यानंतर एका खाजगी वाहिनीने फक्त नाटक केलेला प्राधान्य दिले होते. तर झी वाहिनीने महत्त्वाचे म्हणावेत अशा निवडक नाटकांची निर्मिती केली होती. सह्याद्री वाहिनीने ठराविक दिवशी गाजलेली नाटके ही प्रेक्षकांना पाहतायत पाहता यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले होते. सर्वोत्तम नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावे या दृष्टीने परिसंवादाचे आयोजनही केले होते सांगायचे म्हणजे छोट्या पडद्याने आपल्या पद्धतीने प्रयत्न केलेले आहेत.
परंतु कायमस्वरूपी व्यासपीठ मात्र कोणालाही देता आलेले नाही परंतु महाराष्ट्र शासन मात्र स्पर्धेच्या माध्यमातून जुनी नाटके प्रेक्षकांना कसे पाहता येतील हा प्रयत्न केलेला आहे. याचा अर्थ सर्वोत प्रेक्षकांना याचा आनंद घेता येतो असे नाही. अल्ट्रा झकास मराठी ओटीटीने गेल्या अनेक वर्षात एक चांगला उपक्रम राबवलेला आहे तो म्हणजे जुन्या कलाकृतींचे संग्रह केले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या डिजिटल उपक्रमात नाटकाचा आनंद घेतो येतो. हे फारसे ज्ञात नाही परंतु जागतिक मराठी रंगभूमीच्या निमित्ताने त्यांनी हा खजाना हाच प्रेक्षकांसाठी उलघडून सांगितलेला आहे. प्रेक्षक थक्क होतील आणि त्यात अंतर्मुख होतील अशा नाटकांचा यात समावेश आहे. या निमित्ताने नाट्यसंस्था, त्यात सहभागी असलेले कलाकार, तसेच ज्यांनी रंगभूमीसाठी योगदान दिले आहे. त्यांचा अभिनय पाहणे हे प्रेक्षकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. ओटीटीवर केव्हाही या अनमोल खजिनचा आनंद प्रेक्षकांना घेता येईल.
Kunal Kamra: कुणाल कामराच्या अडचणी आणखी वाढ, कॉमेडियनवर तीन गुन्हे दाखल!
सत्तरहून अधिक नाटके
सिनेमा आणि ओटीटीच्या प्रभावामुळे नाटक मागे पडेल आहे असे वाटते पण तसे झालेले नाही. उलट, आता डिजिटल काळातील रंगभूमी नव्या पायरीवर पोहोचतेय. समांतर नाट्यप्रवाह, एकांकिका, डिजिटल थिएटर आणि इमर्सिव्ह थिएटर यांसारख्या नव्या संकल्पनांमुळे रंगभूमीला नवसंजीवनी मिळते आहे. आपण भूतकाळ आणि भविष्य दोन्ही जपण्याचा संकल्प करूया! कारण ‘तिसरी घंटा, पुन्हा एकदा’ या खास उपक्रमात, ती खास तिसरी घंटा पुन्हा वाजणार आणि प्रेक्षकांना ७० हून अधिक भन्नाट मराठी नाटकांचा आनंद डिजिटल माध्यमातून अल्ट्रा झकास ओटीटी वर अनुभवता येणार आहे.
कोट्यावधी फसवणुकीच्या आरोपावर श्रेयस तळपदेने सोडले मौन, म्हणाला – ‘हे दुःखद आहे की…’
पुन्हा एकदा स्मरण
कधीकाळी विजय चव्हाण, लक्ष्मीकांत बेर्डे, रमेश भाटकर, प्रदीप पटवर्धन, निळू फुले, अविनाश खर्शिकर, अतुल परचुरे, मच्छिंद्र कांबळी यांसारख्या दिग्गज कलाकारांनी आपल्याला रंगभूमीवरून खळखळून हसवले, विचार करायला लावले आणि मनात कायमचे स्थान निर्माण केले. मात्र, आज त्यांची जिवंत अभिनयशैली, प्रेक्षकांना बांधून ठेवण्याची ताकद पुन्हा अनुभवता येईल. ते या ओटीटीमुळे. ही सर्व नाटके प्रामुख्याने विनोदी असली तरी त्यामधून महत्त्वाचे सामाजिक आणि सांस्कृतिक संदेश मिळतात. श्रीमंत दामोदर पंत, यदा कदाचित, जाऊ बाई जोरात, कुमारी गंगूबाई मॅट्रिक, चाळ नवाची खट्याळ वस्ती, डबल क्रॉस, मागणी तसो पुरवठो, सगळे सभ्य पुरुष, सूर्यास्त ही नाटके प्रेक्षकांना हसवताना समाजातील विसंगती, नातेसंबंधांतील जिव्हाळा आणि वास्तवाची जाणीव करून देतात.