exam( फोटो सौजन्य: social media)
UPSC NDA & NA, CDS परीक्षा II 2025: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) आज 7 जुलै रोजी NDA & NA-II, 2025 आणि CDS-II, 2025 परीक्षेकरीता अर्ज केलेल्या फॉर्ममध्ये सुधारणा/संपादने करण्यासाठी दुरुस्ती विंडो उघडली आहे. NDA & NA-II, 2025 आणि CDS-II, 2025 परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार 7 जुलै 2025 सकाळी 10 ते 9 जुलै 2025 रात्री 11:59 पर्यंत अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in ला भेट देऊ शकतात आणि त्यांच्या अर्ज फॉर्ममध्ये सुधारणा करू शकतात. CDS-II परीक्षा 14 सप्टेंबर 2025 (रविवार) रोजी तीन शिफ्टमध्ये UPSC द्वारे घेतली जाईल. NDA & NA-II, 2025 परीक्षा14 सप्टेंबर 2025 रोजी घेतली जाईल.
परदेशात मिळाली नोकरी पण देशसेवेचा वेड शांत बसू देईना! मायदेशी परतून क्रॅक केली UPSC
UPSC CDS (II) परीक्षा 2025 ची रिक्त पदांची माहिती-
१. इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडून – 100 पदे
२. इंडियन नेव्हल अकादमी, एझिमला 26 पदे
३. एअर फोर्स अकादमी, हैदराबाद – 32 पदे
४. ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, चेन्नई (SSC पुरुष) – 276 पदे
५. ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, चेन्नई (SSC महिला) – 19 पदे
एनडीए रिक्त पदांची माहिती –
1. आर्मी – 208 (10 महिला पदे)
2. नेव्ही – 42 (5 महिला पदे)
3. एअर फोर्स – फ्लाइंग – 92 (2 महिला पदे)
4. ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) -18 (2 महिला पदे)
5. ग्राउंड ड्युटी (नॉन-टेक्निकल) – 10 (2 महिला पदे)
6.नेव्हल अकादमी (एनए) (10+2 कॅडेट प्रवेश योजना) 36 (4 महिला पदे)
UPSC NDA-2 आणि CDS-2, 2025 अर्ज फॉर्म कसा दुरुस्त करायचा-
1. सर्वप्रथम, उमेदवारांना अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in ला भेट द्यावी लागेल.
2.यानंतर, तुम्हाला होम पेजवर दिलेल्या ‘UPSC NDA & NA, CDS परीक्षा II 2025 सुधारणा विंडो’ या लिंकवर क्लिक करावे लागेल.
3. यानंतर, अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
4. यानंतर, तुमच्या अर्ज फॉर्ममध्ये दुरुस्त्या करा.
5. यानंतर, दुरुस्ती शुल्क जमा करा.
6. यानंतर, ते सबमिट करा आणि भविष्यासाठी त्याची प्रिंटआउट घ्या.
‘स्लीप चैंपियन ऑफ द ईयर’ बनली यूपीएससी एस्पिरेंट; कमावले ९ लाख रुपये