Yuvraj Singh
Yuvraj Singh Reveals Hilarious Incident Border Gavaskar Trophy 2007-08 : अगदी काही दिवसांवर अलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीचे सामने लवकरच सुरुवात होणार आहे. या 22 नोव्हेंबरला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात हे सामने सुरू होणार आहेत. या दोन्ही संघांमधील हे सामने पाहण्यात एक वेगळा रोमांच असतो. या ट्रॉफीचे सर्व सामने खूपच रोमांचक असतात तर किस्सेही कायम लक्षात राहण्यासारखे असतात. २००७-०८ची बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील असाच एका मजेशीर किस्सा युवराज सिंगने याने सांगितला आहे.
अभिनेत्रीसोबत डेटींगवर असतानाचा सांगितला किस्सा
Yuvraj Singh shares story about his date with an actress in Australia.
Guess who? 😉
📺 Club Prairie Fire YT pic.twitter.com/jZKoDF499V
— Ajay AJ (@AjayTweets07) September 26, 2024
क्लब प्रेरी फायर पॉडकास्टवर बोलताना युवराजने सांगितला किस्सा
क्लब प्रेरी फायर पॉडकास्टवर बोलताना युवराज सिंगने हा मजेदार किस्सा शेअर केला. पॉडकास्टवर बोलताना युवराज सिंगने सांगितले की या स्पर्धेदरम्यान तो एका अभिनेत्रीला डेट करीत होता, जिचे स्लिप-ऑन्स (चप्पल) घालून तो एअरपोर्टवर गेला जे पाहून सर्व जणांनी त्याची मजा घेतली. युवराज सिंगने किस्सा सांगताना म्हटलं, या काळात मी एका एका अभिनेत्रीला डेट करीत होतो, तिचं नाव मी नाही घेणार. ती त्या दरम्यान खूप प्रसिद्ध आणि अनुभवी अभिनेत्री होती. आम्ही बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला गेलो होतो, तेव्हा ती अॅडलेटमध्ये शूट करीत होती.
अभिनेत्रीने पिच्छा पुरवला
युवराजने तिला आधीच सांगितले होते की, या महत्वाच्या कसोटी मालिकेवर त्याला लक्ष केंद्रित करायचं आहे त्यामुळे मला भेटू नकोस पण तरीही ती त्याचा पाठलाग करीत कॅनबेरापर्यंत पोहोचली होती. मी तिला सांगितलं होतं, हे बघ काही दिवस आपण नको भेटूया, कारण मी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे आणि मला फोकस करून खेळायचं आहे. तिने अक्षरश: माझ्या बसचा कॅनबेरापर्यंत पाठलाग केला. दोन कसोटी सामन्यांमध्ये माझी साधारण कामगिरी राहिली, मी फार धावा करू शकलो नाही,” असं युवराजने सांगितलं.
सगळ्यांनीच घेतली मजा
युवराज सिंगने यानंतर तिच्याशी या विषयावर बोलायचं ठरवलं, युवराज गर्लफ्रेंड अभिनेत्रीला म्हणाला, “तू इथे काय करतेयस? आणि यावर तिने उत्तर दिलं, मला तुझ्याबरोबर इथे वेळ घालवायचा आहे.” यानंतर या घटनेने एक मजेशीर वळण घेतलं आणि युवराज सिंगबरोबर एक खूपच हास्यास्पद किस्सा घडला.
पुढे सांगताला युवराज म्हणाला, मी सकाळी तिला विचारलं, “अरे माझं शूज कुठे आहेत? ती म्हणाली, मी ते बॅगेत पॅक केले. मग मी विचारलं, अरे मग मी बसमध्ये काय घालून जाऊ? यावर ती म्हणाली, माझी चप्पल घाल… यानंतर त्याचे शूज पॅक केल्याने युवराजला जबरदस्ती तिचे गुलाबी रंगाचे चप्पल घालून तो टीम बसमध्ये गेला.”