Want a job then quit smoking and tobacco
दिल्ली : नोकरी (job ) मिळवायची असल्यास तुम्हाला आता तंबाखू आणि सिगारेटचे (Want a job then quit smoking) सेवन करणे सोडावे लागणार आहे. असा अजब फतवा झारखंड सरकारने (state issued a strange rule) काढला आहे. सर्वांनाच सकारी नोकरी (Government) हवी असते. नोकरी मिळवण्यासाठी अनेकजण सगळ्या मार्गांचा वापर करतात. परंतु आता झारखंड सरकारने तरुणांपुढे नोकरीसाठी अट ठेवली आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या सर्वांनी तंबाखूजन्य आणि इतर व्यसने सोडावी लागणार आहेत. तसेच भविष्यातही व्यसन करणार नाही असे प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल. असे सरकारने म्हटले आहे.
हा निर्णय १ एप्रिलपासून झारखंडमध्ये लागू होणार आहे. सरकारने लागू केलेला हा निर्णय त्याच युवक आणि इच्छुकांना लागू असेल जे सरकारी कामासाठी कोणत्याही भागात रुजू होणार किंवा अर्ज करणार आहेत. झारखंडमध्ये नुकत्याच झालेल्या तंबाखू नियंत्रण समितीच्या बैठकीत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये खाद्यपदार्थांची विक्री होणार नाही. तसेच तेथे चहा आणि बिस्किटांचीही विक्री होणार नाही. असे अहवालात म्हटले आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रिवरील निर्बंध आणण्याच्या निर्णयावर एकमत झाल्यास नवीन पिढीला तंबाखूचे सेवन करण्यासारख्या वाईट सवयीपासून वाचवण्यासाठी मदत होईल असे झारखंडचे मंत्री आलमगीर यांनी म्हटले आहे.
सरकारी नोकरीसाठी इच्छुक अर्जदारांकडून तंबाखूचे सेवन न करण्याची अट आहे. हे प्रतिज्ञापज्ञत्रात नमूद करुन द्यावं लागेल. त्यांना कार्यालयातच नाही तर कार्यालयाबाहेरही तंबाखूशी संबंधित उत्पादनांचे सेवन करु शकणार नाही. भाजपने या उपक्रमासाठी राज्य सरकारचे स्वागत केले आहे. तसेच राज्य सरकारने यानंतर दारुबंदी बाबत विचार करावा असे शिवपूजन पाठक यांनी म्हटले आहे. झारखंडमध्ये तंबाखू आणि सिगारेसंबंधी निर्णय १ एप्रिलपासून लागू करण्यात येणार आहे.