Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

थकबाकीदारांना वॉरंट बजाविण्याची उद्यापासून मोहिम; जुन्या थकितांच्या मालमत्ता सील करण्याचे आदेश

सातारा पालिकेच्या वसुली विभागाची प्रशासक मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी शनिवारी बैठक घेऊन कर्मचाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. थकबाकीदारांना थेट वॉरंट बजावा, वसुली करा अन्यथा थेट त्यांच्या मालमत्ता सील करा, असे स्पष्ट आदेश मुख्याधिकाऱ्यांनी दिले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 01, 2022 | 05:41 PM
थकबाकीदारांना वॉरंट बजाविण्याची उद्यापासून मोहिम; जुन्या थकितांच्या मालमत्ता सील करण्याचे आदेश
Follow Us
Close
Follow Us:

सातारा : सातारा पालिकेच्या वसुली विभागाची प्रशासक मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी शनिवारी बैठक घेऊन कर्मचाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. थकबाकीदारांना थेट वॉरंट बजावा, वसुली करा अन्यथा थेट त्यांच्या मालमत्ता सील करा, असे स्पष्ट आदेश मुख्याधिकाऱ्यांनी दिले.

मुख्याधिकारी बापट यांनी शनिवारी सुट्टीच्या दिवशी वसुली विभागात ठाण मांडत सर्व वसुली कर्मचाऱ्याची बैठक घेऊन त्यांना परखड वसुली आणि महसूल वाढीच्या कठोर कानपिचक्या दिल्या. यावेळी वसुली अधीक्षक प्रशांत खटावकर, सहाय्यक अधीक्षक प्रसन्ना जाधव उपस्थित होते.

या बैठकीत बापट यांनी वसुली प्रक्रियेचा सर्वंकष आढावा घेतला. वसुली टक्केवारी अगदीच तेरा टक्क्यांवर येऊन ठेपल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत वसुली वाढविण्याचे सूचित केले. पालिकेची एकूण थकबाकी 44 कोटी असून दावे आणि अपिल यामधून दहा कोटी वसूल झाले आहेत. उर्वरीत 34 कोटीपैकी वसुली विभागाने 9 कोटी 78 लाख रुपयांची वसुली केली असून उर्वरीत 24 कोटी रूपयांपैकी जास्तीत जास्त वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

2014 नंतर ज्या मिळकती नव्याने हद्दवाढीच्या भागासह मूळ गावठाणामध्ये उभ्या राहिल्या आहेत. त्या सर्व मिळकतींची घरपट्टीची बिले १५ जानेवारीपर्यंत तातडीने पोहोच करण्याचे आदेश बापट यांनी दिले. ज्यांची थकबाकी जास्त आहे. त्यांची यादी बनवून त्यांना सोमवार पासून वॉरंट बजावण्यास सुरवात करा आणि ज्यांची थकबाकी वसूल होणार नाही त्याची प्रॉपर्टी थेट सील करा, असे स्पष्ट आदेश प्रशासकांनी दिल्याने सोमवारपासून अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले यांच्या अंर्तगत पालिकेची चार पथके वसुलीसाठी बाहेर पडणार आहेत.

पोवई नाक्यावरील बड्या थकबाकीदाराने किती शास्ती भरली? तसेच संबधित व्यावसायिकाच्या कार्य क्षेत्रातील भाडेकरूंच्या स्वतंत्र नोंदी घेण्यात आल्यात का? याची माहिती बापट यांनी बैठकीत विचारली मात्र या भागाचे लिपिक लगड हे गैरहजर राहिल्याने या प्रकरणाचा खुलासा झाला नाही.

वसुली विभागाचे अधीक्षक प्रशांत खटावकर यांची वसुली विभागातून बदली होणार असल्याची जोरदार चर्चा होती. या विभागाचा चार्ज नगराध्यक्षांचे स्वीय सहाय्यक अतुल दिसले यांना मिळणार असल्याच्या माहितीने जोर धरला आहे. मात्र, आपली बदली होणार असल्याच्या वृत्ताचे मात्र खटावकर यांनी खंडनं केले मला असे कोणतेही बदलीचे आदेश प्राप्त झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Warrant issuing for defaulters in satara nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2022 | 05:41 PM

Topics:  

  • Satara Municipality

संबंधित बातम्या

नगरपालिका मालमत्तेवर राजकीय छत्रछाया?; सातारा पालिकेच्या 600 भूखंडांचा तपास सुरू
1

नगरपालिका मालमत्तेवर राजकीय छत्रछाया?; सातारा पालिकेच्या 600 भूखंडांचा तपास सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.