LGBTQ समाजावर प्रोजेक्ट करताना कोणत्या प्रोब्लेम्सला सामोरं जावं लागलं, नक्षत्र बागवेने फॅमिलीबद्दलही दिली महत्वाची प्रतिक्रिया
सध्या युट्यूबसह सर्वत्र सोशल मीडियावर नक्षत्र बागवेच्या ‘द व्हिजिटर’ (The Visitor)वेबसीरीजची कमालीची चर्चा होताना दिसत आहे. १० एपिसोडची असलेली ही सीरीज LGBTQ समाजावर आधारित आहे. सीरीजच्या प्रमोशननिमित्त नक्षत्र बागवेने नवराष्ट्र डिजीटलसोबत संवाद साधला. त्याने मुलाखतीमध्ये सीरीजविषयी दिलखुलास चर्चा केली आहे.
सीरीज करण्याचे ठरवल्यानंतर मनात अनेक प्रश्नांचं झंजाळं तयार झालं असेल, ते कसं सोडवलं ? सीरीज करताना कोणकोणते अडचणी आणि समस्या आल्या ? शिवाय LGBTQ समाजावर आधारित असलेल्या प्रोजेक्ट्सबद्दल फॅमिलीचा कसा प्रतिसाद होता. या प्रश्नावर नक्षत्रने सांगितले की, “मी सर्वात आधी ‘अगल बगल’नावाची सीरीज केली होती. ही सीरीज माझी सेक्शुअल कॉमेडी होती. जे मी या सीरीजचे २ ते ३ मिनिटांचे चंक्स एडिट करुन इन्स्टाग्रामवर अपलोड करायचो. त्या सीरीजला लोकांचा वाढता प्रतिसाद पाहत मी सीरीज करण्याचा विचार केला. नाही तर त्याच्यापूर्वी मी शॉर्टफिल्मच करायचो. फनी आणि सेक्शुअल कॉमेडीवर सीरीज केल्यानंतर लोकांमधल्या भावनांवर प्रकाशझोत टाकणाऱ्या प्रोजेक्ट्सवरही काहीतरी कंटेंट बनवावा यासाठी मी ‘द व्हिजिटर’सारखी वेबसीरीज प्रेक्षकांच्या समोर आणली, जी अगदी सत्य घटनेवर आधारित वाटते आणि सगळ्यांच्या जीवनावर आधारित वाटते.”
“अनेकांना असं वाटतं की, LGBTQ दिग्दर्शकांना चित्रपटासंबंधित प्रोब्लेम्स येत असतील. पण तसं काही मला जाणवलं नाही. माझ्या आई- बाबांनी मला या प्रवासात खूप चांगला प्रतिसाद दिला. मी आणि माझे बाबा ‘द व्हिजिटर’ ही सीरीज एकत्र बसून पाहत आहोत, कारण त्यांना सर्वच एपिसोड एकत्र पाहायला आवडतात. माझी फॅमिली माझ्या सेटवर येते. सोबतच सीरीजमधले कलाकारही माझ्या घरी येतात. माझ्या घरच्यांनी मला फार पाठिंबा दिला. मी घरी समलैंगिक असल्याचं सांगितल्यानंतर त्याच्या पाच वर्षांनी त्यांनी मला स्विकारलं. खरंतर हा प्रवास माझ्यासाठी फार मोठा होता. तो प्रवास मी शब्दांमध्ये नाही मांडू शकत नाही. माझी फॅमिली माझ्या कामाचं कायमच कौतुक करत असतात, शिवाय ते माझ्या अभिनयाचंही ते कौतुक करत असतात. सर्वच मला फार सपोर्टिव्ह मिळाले आहेत. मी केलेली शॉर्टफिल्म आणि सीरीज ते माझ्यापेक्षा सर्वात आधी तेच शेअर करत असतात. सर्वांचा कायमच मला आशिर्वाद मला मिळत आला आहे.”
Rana Naidu Season 2: ‘आता होणार खरी तोडफोड मामू’, ‘राणा नायडू सीझन २’ जबरदस्त टीझर प्रदर्शित!
“माझे सर्वच प्रोजेक्ट्स LGBTQ समाजावर आधारित आहे. त्यामुळे मी माझ्या प्रोजेक्टमध्ये LGBTQ समाजातील लोकांनाच घेतो, त्यांनाच मी अभिनय करायला लावतो. पण त्यामध्ये फार वेळ जातो. पण ठिक आहे, मी कायमच माझ्या शब्दावर ठाम राहिलोय. LGBTQ समाजाच्या प्रोजेक्ट्ससाठी मला लोकांनी फार मदत केली आहे. विशेष म्हणजे, मला ‘द व्हिजिटर’ सीरीजसाठी फायनान्शियल मदतीची गरज होती आणि मला ती मिळाली सुद्धा. मुख्य म्हणजे प्रमोशनच्या बाबतीतही आम्हाला अनेकदा खंत वाटते. त्यासाठी LGBTQ समाजातील प्रोजेक्ट्सला अनेक वर्षे तरीही प्रोब्लेमला तोंड द्यावा लागणार आहे. मला माझ्या प्रोजेक्ट्समध्ये अनेकदा माझ्या आई- वडिलांनी फार मदत केली आहे, जेव्हा मी फार नवीन कलाकार होतो त्यावेळी, ते मला मदत करत होतो. काही प्रोजेक्ट्सची शुटिंग माझ्या आईने केली आहे. साध्या मोबाईलच्या माध्यमातून तिने ती शुटिंग केली आहे. माझी आई आज या जगात नाही, त्यामुळे कायमच मला तिची आठवण येते. आई- वडिलांची मला माझ्या कामांमध्ये फार मोठी मदत झाली आहे.”