(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)
राणा दग्गुबती, व्यंकटेश दग्गुबती यांची गुन्हेगारी नाटक मालिका राणा नायडू तिच्या दुसऱ्या सीझनसह परतली आहे. या मालिकेचा टीझर प्रदर्शित झाला आहे. मालिकेत गुन्हेगारी सस्पेन्सने भरलेली पात्रे पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे या सीझनमध्ये अर्जुन रामपालची एन्ट्री झाली आहे, तो मालिकेच्या मागील सीझनचा भाग नव्हता. हा सीझन चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. हा टीझर प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे. तसेच सोशल मीडियावर त्यांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
नेटफ्लिक्सवर टीझर रिलीज झाला
या टीझरच्या रिलीजसोबत नेटफ्लिक्सने लिहिले, ”आता होणार खरी तोडफोड मामू”, कारण ही राणा नायडूची शैली आहे. या वर्षी ओटीटी चॅनल नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणारा राणा नायडू सीझन २ पहा.’ असे लिहून त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. तसेच या चित्रपबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
असे आहेत मालिकेतील संवाद
मालिकेच्या रिलीज झालेल्या टीझरमधील संवाद असा आहे. ‘हा नशा है राणा, आणि तुला त्याचे व्यसन लागले आहे’. टीझरमध्ये अर्जुन रामपाल आणखी एक संवाद बोलताना दिसतो आहे. ‘तुला लोकांसोबत खेळ खेळायला खूप आवडते, नाही का? तर आज आपण एक खेळ खेळूया.’ व्यंकटेश दग्गुबातीचा संवाद आहे. ‘या जगात फक्त एकच माणूस आहे जो राणाला तोडू शकतो आणि तो म्हणजे त्याचे वडील.’ असे या चित्रपटामधील संवाद चाहत्यांना वेडे करत आहेत.
सोनू निगमची लाईव्ह शो दरम्यान बिघडली तब्येत; गायक स्टेजवरून खाली येताना दिसला वाईट अवस्थेत!
हे कलाकार चमकणार आहेत
ही मालिका या वर्षी २०२५ मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे, सध्या मालिकेची रिलीज तारीख अंतिम नाही. या चित्रपटाची निर्मिती सुंदर आरोन यांनी केली आहे. या मालिकेत राणा दग्गुबती, व्यंकटेश दग्गुबती, अर्जुन रामपाल, कृती खरबंदा, सुची पिल्लई, अभिषेक बॅनर्जी हे देखील दिसणार आहेत. राणा नायडू हा प्रसिद्ध अमेरिकन टीव्ही मालिका रे डोनोव्हनचा भारतीय रूपांतर आहे. प्रेक्षकांना अमेरिकन टीव्ही मालिका खूप आवडली आणि आता तिच्या भारतीय रूपांतरालाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.