Who hired a homeguard? Return to work: Demand from Homeguard Federation
गोंदिया : पोलिसांना मदत व्हावी यासाठी शासनाच्या वतीने होमगार्ड (गृहरक्षक दल) यांना सेवा देण्यात आली आहे. त्यानुरूप राज्यातील होमगार्ड यांना सहा महिने काम देण्याचे निर्देश माजी मुख्यमंत्र्यांच्या (Former Chief Minister) अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या उपसमितीने घेतला होता. त्यानुसार संपूर्ण राज्यात होमगार्ड (Homeguard) कर्तव्य बजावत होते. परंतु, अचानक होमगार्ड (Homeguard) यांना तत्काळ बंदोबस्तावरून कमी करण्यात आले. यामुळे, होमगार्ड (Homeguard) यांचे नुकसान झाले असून त्यांचा रोजगार हिरावला गेला आहे. त्यामुळे, होमगार्ड यांना तत्काळ पुर्ववत कामावर घेण्यात यावे, अशी मागणी होमगार्ड महासंघाच्या (Homeguard Federation) वतीने करण्यात आली आहे.
[read_also content=”वनविभागाच्या टायगर बचाव मोहिमेचा उपयोग तो काय ? मागच्या वर्षी चक्क ५९ वाघांची झाली शिकार https://www.navarashtra.com/bhandara/vidarbha/bhandara/what-is-the-use-of-forest-departments-tiger-rescue-mission-last-year-59-tigers-were-hunted-nraa-230733.html”]
सामाजिक उपक्रमात पोलिसांच्या बरोबरीने सेवा देणाऱ्या गृहरक्षक (Homeguard) दलाला त्याच तोडीचा सामाजिक दर्जा देण्यात शासन अपयशी ठरल्याने गृहरक्षकांना आता नैराश्याने घेरले आहे. गृहरक्षक दल हा पोलीस विभागाच्या समकक्ष विभाग म्हणून शासनलेखी नोंद आहे. राज्याचा पोलीस महासंचालक दर्जाचा समादेशक गृहरक्षक (Homeguard) दलावर निगराणी ठेवतो. पोलिसांना साह्यभूत अशी भूमिका या खात्याकडे असते. पोलीस व समाजाचा मित्र म्हणून अहोरात्र काम कारणाऱ्या गृहरक्षकांना मात्र आर्थिक व अन्य मदतीचा हात न मिळाल्याने ते नाराजी व्यक्त करीत आहे.
[read_also content=”नागपुरात महिलेच्या फुप्फुसातून निघाली चक्क लवंग, पाहून डॉक्टरही चक्रावले…. कर्करोगाची शंका https://www.navarashtra.com/maharashtra/vidarbha/nagpur/in-nagpur-cloves-came-out-of-a-womans-lungs-and-even-the-doctor-got-dizzy-when-he-saw-her-suspicion-of-cancer-nraa-“]
पोलीस घटकाकरीता कायमस्वरूपी होमगार्डची (Homeguard) बंदोबस्त ड्युटी मागील चार महिन्यांपासून राज्यासह गोंदिया जिल्ह्यात महिला व पुरूष यांना प्रत्येकी दोन महिने याप्रमाणे वर्षभरात १८० दिवस काम देण्याचे माजी मुख्यमंत्री (Former Chief Minister) यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या उपसमितीने ठरविले होते. त्यानुरूप मागील चार महिन्यांपासून आळीपाळीने ४० टक्के होमगार्ड (Homeguard) कर्तव्यावर होते. परंतु, १० जानेवारी २०२१ पासून आकस्मिकरित्या होमगार्ड महासमादेशक मुंबई यांच्या आदेशानुसार राज्यासह गोंदिया होमगार्ड (Homeguard) यांना बंदोबस्तावरून तत्काळ कमी करण्यात आले. यामुळे, त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. तरी, शासनाने राज्यासह गोंदिया होमगार्ड (Homeguard) यांना पुर्ववत कामावर रूजू करावे तसेच, या प्रकारामुळे शासनाची दुपट्टी भूमिका चव्हाट्यावर आली असून या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा होमगार्ड महासंघाच्या (Homeguard Federation) वतीने करण्यात आली आहे.