KL Rahul Met LSG Owner Sanjiv Goenka in His Office at Kolkata
KL Rahul Met LSG Owner Sanjiv Goenka in His Office at Kolkata : भारताचा माजी उपकर्णधार तथा विकेटकीपर केएल राहुल सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर निवृत्तीची टाकलेली पोस्ट त्यानंतर त्याचा बिघडेलेला परफॅार्मन्स आणि भारतीय संघातून हरवलेले त्याचे स्थान पाहता तो चांगलाच चर्चेत आला. मागच्या आयपीएल हंगामात लखनऊचा झालेला पराभव मालक संजीव गोयंका यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे सगळ्यांनी पाहिले त्यानंतर त्यांनी भरमैदानात राहुलला सुनावल्याचेही मैदानात कैद झाले होते. मात्र त्यानंतर केएल राहुल LSG सोडणार असल्याच्या जोरदार चर्चा पाहायला मिळाल्या. परंतु, आता या गोष्टीला पूर्णविराम मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.
केएल राहुल आणि लखनऊचे मालक यांच्यात भेट
KL Rahul met Sanjeev Goenka in Kolkata.
– Lucknow Supergiants eager to retain KL for IPL 2025. (Cricbuzz). pic.twitter.com/PEjFAI08fh
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 26, 2024
राहुल लखनऊसोबतच
भारताचा माजी स्टार क्रिकेटर तथा विकेटकिपर राहुलने सोमवारी कोलकाता येथे संघाचा कर्णधार संजीव गोएंका यांची भेट घेतली. त्यामुळे अनेक चर्चांणा उधाण आले होते. राहुलने संघासोबत राहणार असल्याचे स्पष्ट केल्याचे वृत्त आहे. मग मिटींगमध्ये काय चर्चा झाली. याचे उत्तर काही दिवसांनी कळणार आहे. पण राहुल संघासोबत राहू शकतो अशी बातमी आहे. लखनऊचा संघ त्याला कायम ठेवू शकतो. पण आयपीएल 2025 मध्ये तो संघाचा कर्णधार असणार की नाही. यावर प्रश्नचिन्ह आहे.
राहुलला नकोय कर्णधारपद
गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार, राहुलला कर्णधारपदाच्या दबावामुळे पायउतार व्हायचे आहे आणि त्याला फक्त फलंदाज म्हणून योगदान द्यायचे आहे. मात्र, राहुलने कर्णधारपद स्वीकारले नाही तर ही भूमिका कोणाला मिळू शकते, या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. प्रसारमाध्यमांवरील वृत्तांवर विश्वास ठेवला तर राहुलचे कर्णधारपद गमावणे निश्चित आहे आणि त्याच्या जागी दोन नावे उदयास येत आहेत – निकोलस पूरण आणि कृणाल पंड्या.
दोघांची भेट तासभर चालली
क्रिकबझने केएल राहुल आणि एलएसजीचे मालक यांच्यातील भेटीची बातमी दिली होती. अलीपूर येथील न्यायाधीश कोर्ट रोडवरील गोएंका यांच्या कार्यालयात झालेली ही बैठक सुमारे तासभर चालली. बैठकीचा अजेंडा जाहीर करण्यात आला नाही. परंतु असे वृत्त आहे की दोघांनी राहुलच्या LSG भविष्याबद्दल आणि IPL 2025 च्या मेगा लिलावापूर्वी संभाव्य संघ संयोजनाविषयी चर्चा केली.
सोमवारी राहुल आणि संजीव गोयंका यांची भेट झाली तेव्हा कर्णधारपद आणि कायम ठेवण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. मात्र, राहुलला स्वतःला फलंदाज म्हणून संधी द्यायची असल्याने कर्णधार म्हणून खेळणार नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. गोयंका यांना राहुलवर पूर्ण विश्वास असून त्याला खेळाडू म्हणून कायम ठेवण्यात येईल. मात्र तो कर्णधारपदाच्या भूमिकेत असणार नाही. संघाशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, कर्णधारपदाच्या भूमिकेवर अद्याप विचार केला जात आहे. आणि BCCI चे रिटेन्शन पॉलिसी अजून यायची आहे, त्यामुळे आमच्याकडे पंड्या आणि पूरण शर्यतीत आहेत.
केएल राहुल आरसीबीमध्ये सामील झाल्याची अफवा
उल्लेखनीय म्हणजे, केएल राहुल लखनौपासून वेगळे होऊन आयपीएल २०२५ साठी आरसीबीमध्ये सामील होऊ शकतो अशा अफवा होत्या. मात्र याबाबत अद्याप कोणतेही अपडेट आलेले नाही. केएल राहुल याआधी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून एकदा खेळला आहे. याशिवाय राहुलने सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्जचेही प्रतिनिधित्व केले आहे.