Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा : दिलीप स्वामी

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे जिल्ह्याचे १६० कोटी उद्दिष्टांमधील १३३ कोटीचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. उद्दिष्ट पूर्ततेतून बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी विविध व्यवसाय व त्याचे मार्केटिंग करून सोलापूर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (Dilip Swami) यांनी केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 29, 2022 | 02:17 PM
महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा : दिलीप स्वामी
Follow Us
Close
Follow Us:

कुर्डुवाडी : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे जिल्ह्याचे १६० कोटी उद्दिष्टांमधील १३३ कोटीचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. उद्दिष्ट पूर्ततेतून बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी विविध व्यवसाय व त्याचे मार्केटिंग करून सोलापूर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (Dilip Swami) यांनी केले.

पंचायत समिती कुर्डुवाडी येथे बँक ऑफ इंडिया माढा तालुका सर्व शाखा व तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष उमेदच्या वतीने बचत गटामधील महिलांना कर्ज वितरण प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे बोलत होते. यावेळी माढा तालुक्यातील बँक ऑफ इंडिया मार्फत एकूण ८६ बचत गटांना १ कोटी २५ लाख मंजुरीचे पत्र वाटप करण्यात आले.

यावेळी पंचायत समितीचे सभापती विक्रम शिंदे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रताप पाटील, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, बँक ऑफ इंडियाचे प्रबंधक प्रशांत नाशिककर, विश्वास वेताळ, मिनाक्षी मडीवळी, अमोल सांगळे, सयाजीराव बागल, राहुल मांजरे, शाखा व्यवस्थापक उदय काकपुरे, अजिंक्य आंधळकर, रामचंद्र जाधव आदी उपस्थित होते.

दिलीप स्वामी म्हणाले की, बचत गटाच्या महिलांनी दिलेल्या कर्जाची वेळेत परतफेड करून बँकेत पत निर्माण करावी. आज बचत गटांना कर्ज देण्यामध्ये बँका सकारात्मक आहेत. कोविड लसीकरणात उमेद अभियानातील महिलांचे खूप मोलाचे योगदान करत आहेत. त्याबद्दल कौतुक केले. बचत गटाच्या बाबतीत येणाऱ्या विविध अडचणीवर लक्ष असून, त्याच्यावर योग्य मार्ग काढण्याचा निश्चितच प्रयत्न केले जातील. त्यामुळे सर्वांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करणे गरजेचे असल्याची अपेक्षाही यावेळी व्यक्त केली.

यावेळी बँक अर्थ सहाय्य वितरणमध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम उद्दिष्ट पूर्ण करून उत्कृष्ट काम केल्याबद्दल माढा तालुका उमेद स्टाफचे यावेळी विशेष अभिनंदन करण्यात आले. सदरचा कार्यक्रमाचे सूत्र संचालन तालुका अभियान व्यवस्थापक अवधूत देशमुख यांनी केले तर तर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तालुका व्यवस्थापक शरद सातपुते, कृष्णा लोंढे, सुषमा बिचुकले, गणेश दोरवट, स्वप्निल सुर्वे व सुदर्शन यादव यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Women should enhance the reputation of solapur district through bachat gat says dilip swami nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2022 | 02:17 PM

Topics:  

  • Dilip Swami
  • दिलीप स्वामी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.