Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील 4 फेमस हनुमान मंदिर जिथे झोपलेल्या मुद्रेत आहेत संकटमोचन, एक मंदिर वसलंय महाराष्ट्रात…

भारतभरातील काही खास मंदिरांमध्ये हनुमानजींची झोपलेल्या अवस्थेतील मूर्ती पाहायला मिळते. प्रयागराज, जाम सावली, इटावा आणि खुलदाबाद येथील ही मंदिरे भक्तांसाठी श्रद्धेचे केंद्र आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 18, 2026 | 08:32 AM
भारतातील 4 फेमस हनुमान मंदिर जिथे झोपलेल्या मुद्रेत आहेत संकटमोचन, एक मंदिर वसलंय महाराष्ट्रात...

भारतातील 4 फेमस हनुमान मंदिर जिथे झोपलेल्या मुद्रेत आहेत संकटमोचन, एक मंदिर वसलंय महाराष्ट्रात...

Follow Us
Follow Us:
  • भारतात अनेक हनुमान मंदिर वसले आहे.
  • देशात 4 फेमस हनुमान मंदिर आहेत जिथे हनुमान झोपलेल्या मुद्रेत आहेत.
  • चला या मंदिराविषयी जाणून घेऊया.
भारतामध्ये मंदिरांची समृद्ध परंपरा आहे आणि विविध देवतांची असंख्य मंदिरे देशभर विखुरलेली आहेत. हिंदू धर्मातील अत्यंत पूजनीय देवतांपैकी एक म्हणजे भगवान हनुमान. त्यांना धैर्य, भक्ती, शक्ती आणि निःस्वार्थ सेवेचे प्रतीक मानले जाते. भारतात हनुमानजींची अनेक प्राचीन आणि चमत्कारिक मंदिरे आहेत. बहुतेक ठिकाणी त्यांची मूर्ती उभी किंवा बसलेल्या अवस्थेत दिसते, मात्र काही दुर्मिळ मंदिरांमध्ये हनुमानजींची मूर्ती झोपलेल्या अवस्थेत आहे. चला, अशा खास मंदिरांविषयी जाणून घेऊया.

इतिहासप्रेमी आहात? मग महाराष्ट्रातील या ऐतिहासिक वास्तूंना एकदा तरी भेट द्यायलाच हवी

प्रयागराज येथील मोठा हनुमान मंदिर, उत्तर प्रदेश

प्रयागराजमधील संगमाच्या काठावर वसलेले हे मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे. येथे हनुमानजींची मूर्ती विश्रांती घेतलेल्या अवस्थेत आहे. लोककथेनुसार, लंकेवरील विजय मिळवल्यानंतर थकवा घालवण्यासाठी हनुमानजी येथे विसावले होते. विशेष म्हणजे, दरवर्षी गंगेचे पाणी मंदिराच्या गर्भगृहात येऊन हनुमानजींच्या चरणांना स्पर्श करते. स्थानिकांच्या मते, हा हनुमानजींचा पवित्र स्नान समजला जातो.

जाम सावली येथील हनुमान मंदिर, मध्य प्रदेश

छिंदवाडा जिल्ह्यातील जाम सावली येथे असलेले हे मंदिर अत्यंत प्राचीन व सिद्ध स्थळ मानले जाते. येथे पिंपळाच्या झाडाखाली हनुमानजींची मूर्ती झोपलेल्या अवस्थेत आहे. या मूर्तीच्या नाभीमधून पाण्याची एक धार सतत वाहताना दिसते, जी प्रसाद म्हणून भक्त घेतात. या पाण्यात औषधी गुण असल्याची श्रद्धा असून ते मानसिक व शारीरिक त्रास कमी करण्यास मदत करते, असे मानले जाते.

इटावा येथील पिलुआ वाले हनुमान मंदिर, उत्तर प्रदेश

इटावा जवळ यमुना नदीच्या किनारी हे मंदिर स्थित आहे. येथे हनुमानजींची मूर्ती झोपलेल्या अवस्थेत आहे. भक्त येथे लाडूचा नैवेद्य अर्पण करतात. विशेष म्हणजे, मूर्तीच्या तोंडात ठेवलेला लाडू आपोआप आत जातो, अशी श्रद्धा आहे, जी भक्तांसाठी एक चमत्कारिक अनुभव ठरते.

‘या’ ठिकाणी पार पडला रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचा शाही विवाहसोहळा, एका रात्रीच भाडं आहे इतक…

खुलदाबाद येथील भद्र मारुती मंदिर, महाराष्ट्र

औरंगाबादजवळील खुलदाबाद येथे असलेले भद्र मारुती मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे. येथे हनुमानजी पूर्ण विश्रांतीच्या अवस्थेत असून त्यांच्या चेहऱ्यावर अपार शांतता दिसून येते. भक्तांच्या अखंड भजनांनी प्रसन्न होऊन हनुमानजी येथे या स्वरूपात प्रकट झाले, अशी कथा सांगितली जाते. ही सर्व मंदिरे हनुमानजींच्या वेगळ्या आणि अद्वितीय रूपाचे दर्शन घडवतात. श्रद्धा, भक्ती आणि चमत्कार यांचा संगम असलेली ही ठिकाणे भक्तांसाठी विशेष महत्त्वाची मानली जातात.

 

Web Title: 4 famous hanuman temples in india where lord hanuman is in a sleeping posture travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • Hanuman mandir
  • hanuman temple
  • travel news

संबंधित बातम्या

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट
1

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट

Travel News : थायलंडचे अनोखे मंदिर! इथे पूजा नाही तर फोटोशूट करायला जातात लोक…
2

Travel News : थायलंडचे अनोखे मंदिर! इथे पूजा नाही तर फोटोशूट करायला जातात लोक…

भारतातील थंड वाळवंट जिथे मायनस 35 डिग्रीपर्यंत पोहचते तापमान, जाणून घ्या कुठे आहे ठिकाण?
3

भारतातील थंड वाळवंट जिथे मायनस 35 डिग्रीपर्यंत पोहचते तापमान, जाणून घ्या कुठे आहे ठिकाण?

नशीब नाही, ट्रेनमध्ये ‘या’ फॉर्मुल्याने मिळते विंडो सीट! रेल्वेचा हा नियम बहुतेकांना ठाऊकच नाही
4

नशीब नाही, ट्रेनमध्ये ‘या’ फॉर्मुल्याने मिळते विंडो सीट! रेल्वेचा हा नियम बहुतेकांना ठाऊकच नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.