Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रात्री दुधात मिसळून खा हे ड्राय फ्रूट, तुम्हाला मिळतील 5 मोठे फायदे

आपल्या किचनमध्ये सहज उपल्बध असणारे पदार्थ दूध आणि खजूर. आरोग्यासाठी उत्त्म असणारे हे पदार्थ. रात्री दुधासोबत खजूर खाल्ल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. मात्र खजूर आणि दुधाचे सेवन कधी व कसे करावे हे समजून घ्यावे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 10, 2024 | 01:17 PM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Close
Follow Us:

खजुराचे दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. विशेषत: हिवाळ्यात हे पिण्याचे अनेक मोठे फायदे दिसून आले आहेत.

खजूर आणि दूध या दोन गोष्टी शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. खजुरासोबत दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. वास्तविक, दुधासह खजूर यांचे मिश्रण खूप शक्तिशाली मानले जाते. दोन्हीमध्ये भरपूर पोषक असतात. रात्री खजूरसोबत दूध प्यायल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते. हे दूध हाडे मजबूत करण्यासदेखील मदत करते.

खजूर आणि दूध, दोन्ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. हे एकत्र मिसळून प्यायल्यास ते पॉवर पॅक्ड पेय बनते. जाणून घेऊया खजुराचे दूध पिण्याचे 5 मोठे फायदे.

खजुराचे दूध पिण्याचे फायदे

हाडे मजबूत करते

दूध हे कॅल्शियमचा एक चांगला स्रोत आहे ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. खजूरमध्ये मॅग्नेशियम असते जे कॅल्शियम शोषण्यास मदत करते. अशाप्रकारे खजूर आणि दूध यांचे मिश्रण हाडे मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

हेदेखील वाचा- प्रेशर कुकरमध्ये फक्त 2 शिट्ट्या देऊन घरीच बनवा तूप, तव्यावर तासनतास करावी लागणार नाही मेहनत

पचन

खजूरमध्ये फायबर असते जे पचन सुधारण्यास मदत करते. बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होण्यास मदत होते. दुधामुळे पचनक्रियाही शांत होते.

ऊर्जा

खजूरमध्ये नैसर्गिक साखर असते जी शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करते. दुधामध्ये प्रोटीन असते जे शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देते.

त्वचा

खजूरमध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असते ज्यामुळे त्वचा मुलायम आणि चमकते.

हेदेखील वाचा- तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी योग्य मार्ग कोणता?

ताकद

शरीरासाठी प्रथिने आवश्यक असतात. या दोन्ही प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे. खजूर आणि दुधामध्ये प्रथिनांचे प्रमाण लक्षणीय असते. त्यामुळे या दोन्ही पदार्थांचे सेवन एकत्र केल्याने हाडांची घनता वाढते आणि स्नायू्ंचा विकास होतो. यामुळे तुम्हाला शारीरिक त्रास कमी होईल.

गुडघेदुखी

दुधामध्ये निरोगी प्रमाणात कॅल्शिअम असते. जेव्हा त्यात खजूर मिसळले जाते तेव्हा त्याचे फायदे दुप्पट वाढतात. हाडांची घनता वाढवून हे पेय सांधेदुखी कमी करण्यास मदत करते. हे मिश्रण वजन वाढवण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

फायदे

खजूर आणि दुधाचे सेवन केल्याने चांगली झोप येते, ॲनिमियाची समस्या दूर होते आणि गर्भवती महिलांसाठीही ते फायदेशीर आहे.

कसे करावे सेवन?

रात्री काही खजूर दुधात भिजवा. हे खजूर सकाळी रिकाम्या पोटी दुधासोबत खा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही दूध गरम करूनही पिऊ शकता.

काळजी घ्या

जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अॅलर्जी असेल तर खजूर आणि दूध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मधुमेहाच्या रुग्णांनी साखरेच्या सेवनावर नियंत्रण ठेवावे.

खजूर जास्त प्रमाणात खाल्ल्याने लठ्ठपणा वाढू शकतो.

Web Title: 5 benefits of eating dates mixed with milk at night

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2024 | 01:17 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.