पुरूषांची ताकद वाढविण्यासाठी पदार्थ (फोटो सौजन्य - iStock)
Food For Strong Muscles: आजच्या व्यस्त जीवनात पुरुषांना त्यांचा आहार निरोगी ठेवता येत नसल्याने त्यांचे शरीर आतून कमकुवत होत आहेत. प्रत्येकाला निरोगी राहायचे आहे, मात्र त्यासाठी शरीराला चांगली प्रथिने, खनिजे आणि कार्बोहायड्रेट्स सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध अन्न निवडले पाहिजे, जे पुरुषांना दिवसभर उत्साही ठेवण्यास मदत करतात.
यासाठी न्यूट्रिशनिस्ट श्रद्धा दाभोळकर यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यांनी पुरूषांच्या शरीरातील ताकद वाढावी आणि ऊर्जा कायम टिकून राहावी, तसंच त्यांचे मसल्स मजबूत राहावे यासाठी 5 पदार्थ सांगितले आहेत. या पदार्थांचा नियमित आहारात समावेश केल्यानंतर पुरूषांना नक्कीच उर्जा मिळेल आणि ताकदही टिकून राहील आणि याशिवाय मानसिक आणि शारीरिकदृष्ट्यादेखील त्यांना फायदा मिळेल. (फोटो सौजन्य – iStock)
फॅटी फिश (Fatty Fish)
आहारात फॅटी फिशचा समावेश (फोटो सौजन्य – iStock)
फॅटी फिशमध्ये असे घटक असतात जे तुमच्या मेंदूला तीक्ष्ण करतात. यामध्ये असलेली प्रथिने नवीन पेशींच्या निर्मितीसाठीही मदत करतात, यासोबतच त्यात ओमेगा 3 फॅटी ॲसिड आढळते. हे केसांसाठी फायदेशीर असून कॅन्सरसारख्या आजारांपासूनही बचाव करते. फॅटी फिशच्या सेवनाने हृदय आणि स्नायू मजबूत होतात, जर तुम्हाला या सर्व आजारांपासून स्वतःला दूर ठेवायचे असेल, तर तुमच्या आहारात फॅटी माशांचा अवश्य समावेश करा.
दूध (Milk)
हाडांच्या बळकटीसाठी दूध (फोटो सौजन्य – iStock)
दूध हे कॅल्शियमचे समृद्ध स्त्रोत आहे, ते हाडांच्या विकासासाठी सर्वोत्तम मानले जाते. अगदी लहानपणापासूनच आपल्या मुलांना दूध पिण्याची सवय लावणे गरजेचे आहे. दररोज दूध प्यायल्याने तुमचे हृदय निरोगी राहते, तसेच स्ट्रोकची समस्या टळते. दुधामध्ये असलेले मॅग्नेशियम आणि पेप्टाइड्स शरीरात ग्लुकोज आणि इन्सुलिन संवेदनशीलता संतुलित ठेवतात आणि स्नायू तयार करण्यासाठी दूध सर्वोत्तम मानले जाते.
अंडे (Eggs)
अंडं आरोग्यासाठी उत्तम स्रोत (फोटो सौजन्य – iStock)
अंडे हे नेहमीच आहाराच्या यादीमध्ये वरच्या स्थानावर मानले जाते. अंड्यामध्ये अनेक पोषक तत्व असून दररोज अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो. अंड्यांमध्ये लोह, प्रथिने, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी 6 सोबतच कॅल्शियम, निरोगी चरबी, कॅलरीज, सोडियम आणि पोटॅशियमदेखील असते.
हिरवी भाजी (Green Vegetables)
हिरव्या भाज्यांचा समावेश (फोटो सौजन्य – iStock)
हिरव्या भाज्या आपल्या आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर मानल्या जातात. हिरव्या भाज्या या आपल्यासाठी औषधाचे काम करतात हे अनेकांना माहीतच नसेल. यामध्ये अनेक प्रकारचे पोषक आणि खनिजे आढळतात, जे शरीराला निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त असतात. तुम्ही आहारात नियमित सेवन केले तर अनेक प्रकारच्या आजारांपासून सुरक्षित राहाल.
नट्स आणि बिया (Nuts And Seeds)
ताकद मिळण्यासाठी नट्स आणि बिया (फोटो सौजन्य – iStock)
नट्स आणि बिया नेहमी निरोगी मानल्या जातात. यामध्ये निरोगी चरबी असते आणि भरपूर पोषक तत्वही आढळतात. अनेक घातक रोगांचा धोका कमी करण्यासोबतच तुम्हाला हृदयविकार, स्मरणशक्तीच्या समस्या आणि हाडांची कमकुवतता इत्यादींपासून वाचविण्याचे काम हे करतात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.