फोटो सौजन्य: iStock
लग्न हे आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणांपैकी एक असते. कारण लग्नात फक्त दोन व्यक्ती नाही तर दोन कुटुंब एकत्र येत असतात. खरंतर, लग्नाचा विषय निघाला की आज अनेक जणांचा ओढा हा लव्ह मॅरेजकडे जास्त असतो. याचे कारण म्हणजे आजकाल मुला-मुली दोघांनाही अनोळखी व्यक्तीसोबत आयुष्य घालवणे पटत नाही. तसेच काही जणांना ठरवून केलेले लग्न टिकणार नाही असे वाटत असते. अशा परिस्थितीत, काही जण असतात जे अरेंज मॅरेजवर विश्वास ठेवून आहेत. जर तुम्ही सुद्धा अरेंज मॅरेज करण्याच्या विचारात असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. तुमच्या पार्टनरसोबत अरेंज मॅरेज करण्यापूर्वी तुम्ही खालील प्रश्न विचारणे महत्वाचे आहे.
जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला अरेंज मॅरेजसाठी भेटत असाल तेव्हा त्यांना पालकांच्या लग्नाबद्दल काय आवडते आणि काय आवडत नाही ते आवर्जून विचारा. यावरून दुसऱ्या व्यक्तीला बालपणात किंवा चांगल्या संगोपनात आलेल्या अनुभवांची जाणीव होऊ शकते.
जर तुम्ही लग्नासाठी एखाद्याला भेटणार असाल तर लग्नानंतरच्या जबाबदाऱ्यांबद्दल त्यांना नक्कीच विचारा. जसे की एकमेकांमध्ये जबाबदाऱ्या कशा वाटल्या जातील. यामुळे तुम्हाला समोरच्या व्यक्तीची मानसिकता आणि स्वभाव कळेल.
सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्हाला लग्न का करायचे आहे? जर तुम्ही तुमच्या भावी जोडीदाराला अरेंज मॅरेजसाठी भेटत असाल तर हा प्रश्न आवर्जून विचारा. यावरून तुमच्या भावी जोडीदाराचे विचार तुम्हाला कळतील. ते फक्त सामाजिक प्रतिष्ठेसाठी लग्न करू इच्छितात की त्यांना आयुष्यात जोडीदार आणि सहवासाची गरज आहे? याचे देखील उत्तर मिळेल.
हे खरे आहे की एकाच बैठकीत एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण स्वरूप समजून घेणे कठीण आहे, परंतु तरीही, प्रश्नांद्वारे काही व्यक्तिमत्त्व आणि त्यांचा स्वभाव निश्चित केला जाऊ शकतो. जसे की घरात एखाद्याशी मतभेद झाल्यास ते कसे हाताळायचे. तुमच्या आणि तुमच्या जोडीदारातील भविष्यातील मतभेद सोडवण्यासाठी हे प्रश्न देखील महत्त्वाचे आहेत.
या प्रश्नाचे उत्तर देऊन, तुम्ही समोरच्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व, भावना आणि नातेसंबंधांचे स्वरूप जाणून घेऊ शकता. यावरून तुम्ही त्या व्यक्तीच्या अपेक्षांवर खरे उतरत आहे का? हे देखील समजेल.